रुग्णाच्या बाबतीतली ‘ती’ एक चूक महागात पडली, डॉक्टरला नातेवाईकांनी दिला चोप

बालाजी रुग्णालयात(Balaji Hospital) एका महिलेची आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR)करताना स्टिक नाकात तुटली. त्यामुळे तिच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला(Doctor`s Mistake) मारहाण केली.

    वसई :चाचणी करताना नाकात नळी तुटल्यामुळे विरारच्या डॉक्टरला(Doctor of Virar) नातेवाईकांनी बेदम मारहाण (patients Relatives beaten doctor) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पूर्वेकडील बालाजी रुग्णालयात एका महिलेची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली. त्यामुळे तिच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली.

    जुलाब होत असल्यामुळे शनिवारी एक महिला बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी तिची कोविड आरटीपीसीआर चाचणी करताना नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे नातेवाइकांना कळले. त्यामुळे डॉक्टर पळून जात असल्याचा समज करत हॉस्पिटल खाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला पकडून मारहाण करण्यात आली आहे.

    ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात अजूनही कुणाला अटक केली असल्याची माहिती विरार गुन्हे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.