लस मिळेना अन् परदेशीही जाता येईना, हजारो तरुणांच्या नोकऱ्या कोरोनामुळे धोक्यात

वसईच्या(Vasai) पश्चिम पट्ट्यातील हजारो तरुण जहाजावर नोकरी(Job) करीत आहेत. लॉकडाऊन पूर्वी ते घरी परतले होते.

    वसई : लसीकरणाअभावी(Vaccination) जहाजावर(Ship) जाता येत नसल्यामुळे वसईतील हजारो तरुणांच्या नोकऱ्या(Job) आता धोक्यात आल्या आहेत.

    वसईच्या पश्चिम पट्ट्यातील हजारो तरुण जहाजावर नोकरी करीत आहेत. लॉकडाऊन पूर्वी ते घरी परतले होते.आता त्यांना पुन्हा नोकरीसाठी शिप वर जाण्याचे कॉल आले आहेत. तत्पुर्वी कोवीड प्रतिबंधात्मक लस घेण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून वसईतील सामाजिक कार्यकर्ते रिक्सन तुस्कानो आणि मार्शल कोरिया यांनी महापालिका आयुक्तांकडे शिपवर जाणाऱ्या तरुणांना प्राधान्याने लस देण्यात यावी,अशी मागणी केली होती.

    हीच मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही केली होती. मात्र पालिका आणि मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही हालचाल न करण्यात आल्यामुळे वसईतील हजारो तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

    शिपवर कामाला जाणाऱ्या लोकांना वेळ मिळाल्यास त्यांचे जाॅब वाचतील.बाहेरील पैसा आपल्या देशात येत राहील. बेरोजगारीपासून आपले युवक लांब राहतील, असे रिक्सन तुस्कानो म्हणतात.

    या मागणीबाबत पालिका उपायुक्त आशिष पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नेटवर्कमुळे संपर्क होऊ शकला नाही.