earthquake in himachal pradesh

जव्हार शहरात आज दुपारी १.४० मिनिटांनी एक जोरदार धक्का जाणवला.आजूबाजूच्या परिसरात तसे काही जाणवले नसून केवळ जव्हार शहराच्या परिसरातच हा धक्का(earthquake in jawhar) जाणवला आहे.

जव्हार: जव्हार शहरात आज दुपारी १.४० मिनिटांनी एक जोरदार धक्का जाणवला.आजूबाजूच्या परिसरात तसे काही जाणवले नसून केवळ जव्हार शहराच्या परिसरातच हा धक्का(earthquake in jawhar) जाणवला आहे.

साधारण ८ ते १० दिवसांपूर्वी देखील अशा प्रकारचा एक पण जरा कमी तीव्रतेचा धक्का शहरवासियांनी अनुभवला होता. आज पुन्हा त्यापेक्षा थोड्या अधिक तीव्रतेचा धक्का जव्हार शहरात जाणवल्याने नागरिक भयभीत झाले.बरेच नागरिक आपल्या घरातून बाहेर आले होते.याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता जाणवलेला धक्का हा प्राथमिक माहिती नुसार भूकंपाचा नसल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांनी भयभीत होऊ नये,असे आवाहन तहसील कार्यालयातून करण्यात आले आहे.

आज हा धक्का जाणवला त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बीएसएनएल या मोबाईल नेटवर्कची रेंजदेखील गेल्याने नागरिकांनी याबाबत अधिक माहिती गुगल वर शोधता आली नसल्याने धक्का नेमका कसला होता या करिता केवळ तहसील कार्यालयातून येणाऱ्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

शुक्रवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास जो धक्का जाणवला त्याबाबत आमच्या टीमने सर्च केले आता सदर धक्का हा भूकंपाचा नसल्याचे कळले. तांत्रिक सल्ला माहिती आल्यावर कळविली जाईल.विशेष म्हणजे शहरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये.

- संतोष शिंदे,तहसीलदार,जव्हार

शुक्रवारी दुपारी१ ते १.४० च्या दरम्यान जोरदार धक्का बसला, हे आम्ही अनुभवले. नागरिकांनी घाबरु नये.

- विशाखा अहिरे,नगर सेविका,जव्हार नगर परिषद