पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे हादरे

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातला डहाणू (Dahanu), तलासरी (Talasari), धुंदलवाडी (Dhudalwadi) परिसर आज पुन्हा भूकंपा (Earthquake) च्या धक्क्यांनी हादरला आहे. रात्री १ वाजून १८ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा एक भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू भूगर्भात ५ किमी खोलवर होता. तर सकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी ३.२ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमी खोलवर होता.

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, धुंदलवाडी भागांत सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. आणि या भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र हे मागील दीड वर्षांपेक्षा ही जास्त काळापासून सुरू आहे.