पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

मध्यरात्री १२ वाजताच्या जवळपास ३.१ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात १.८ किमी खोलवर होता. आज सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी ३.८ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा दुसरा भुंकपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमी खोलवर होता.

पालघर : पालघर जिल्ह्यातला डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसर आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. मध्यरात्री १२ वाजताच्या जवळपास ३.१ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात १.८ किमी खोलवर होता. आज सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी ३.८ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा दुसरा भुंकपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमी खोलवर होता.

तर सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी २.५ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा तिसरा भूकंपाचा धक्का बसला . याचा केंद्रबिंदू भूगर्भात ५ किमी खोलवर होता. मागील दीड वर्षांपेक्षा ही जास्त काळापासून या भागांत सतत भूकंपाचे धक्के बसत असून भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र काही थांबता थांबत नाहीये.