mahavitran

मर्देस गावातील एका शेतकऱ्याला गेल्या महिन्यात ७९ कोटींचं(79 crore bill) बिल पाठवले होते. त्यामुळे जोरदार धक्का बसलेल्या या शेतकऱ्यांची बाजू लावून धरत प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केल्यावर सारवासारव करीत महावितरणने बिलामध्ये(electricity bill issue in nalasopara) कपात केली होती. मात्र त्यानंतरही महावितरणाचा(mahavitran) अनागोंदी कारभार सुरूच राहिल्याचं दिसून आले आहे.

  रविंद्र माने,वसई : नालासोपाऱ्यातील एका शेतकऱ्याला ७९ कोटींचे वीज बिल पाठवणाऱ्या महावितरणने ‘हम नही सुधरेंगेे’ असे म्हणत एका रहिवाशाला चक्क एक लाख रुपयांचे बिल पाठवले आहे.

  मर्देस गावातील एका शेतकऱ्याला गेल्या महिन्यात ७९ कोटींचं बिल पाठवले होते. त्यामुळे जोरदार धक्का बसलेल्या या शेतकऱ्यांची बाजू लावून धरत प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केल्यावर सारवासारव करीत महावितरणने बिलामध्ये कपात केली होती. तसेच बिल वितरण करणाऱ्या एजन्सीवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही महावितरणाचा अनागोंदी कारभार सुरूच राहिल्याचं दिसून आले आहे.

  एजन्सीने एकत्र रिडिंग घेतल्याने हे बिल जास्त आले असून त्यांना सुलभ हफ्ते करून दिले आहेत.तसेच रिडींग घेणाऱ्या कामचुकार एजन्सीविरोधात वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या आहेत.

  - सुरेंद्र मुंगारे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता

  नालासोपारा- श्रीप्रस्थ सोसायटी बिल्डींगनंबर २२ बी विंग रूम नंबर ००१ मध्ये राहणाऱ्या सुजित सिंग त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. सिंग यांनी मार्च २०१९ ला घर घेतले होते. त्यांना दर महिन्याला ७०० ते ८५० रुपये वीज बिल येत होते. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून त्यांनी बिल भरलं नव्हतं.त्यामुळे त्यांना २०२० ला ३४५० रुपयांचे बिल आले.दुसऱ्याच महिन्यात तब्बल ५३ हजारांचे बिल आले.त्यामुळे तक्रार केल्यावर चेकींग करण्यासाठी येतो. महावितरणाकडून सांगण्यात. मात्र या चेकिंगला ना येता सिंग यांना तब्बल १००१४० बिल आले. त्यामुळे सुजित सिंग यांना एकच धक्का बसला. त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानंतर महावितरणचे अधिकारी शिंदे यांनी ३० टक्के कपात करून ६४००० भरण्यास सांगितले.

  वसई विरारमध्ये लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात महावितरण विभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. ग्राहकांना लाखो आणि कोट्यवधींची बिले आल्याचे प्रकार उघडकीस आल्याने महावितरण कंपनीच्या कारभारावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत.महावितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापर्यंत २ लाख ४२ हजार ६९६ वाढीव वीज देयकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.