electricity theft

वीजचोरीचे(electricity theft) प्रकार कासा, वाघाडी, वेति, सोमटा, तवा अशा डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये सतत वाढत आहेत.

कासा: वीजचोरीचे(electricity theft) प्रकार कासा, वाघाडी, वेति, सोमटा, तवा अशा डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये सतत वाढत आहेत. दिवसाढवळ्या त्यात थेट विद्युत तारांवर थेट आकडा टाकून विजेची चोरी करण्यासह विद्युत मीटरशी छेडछाड करुन किमान पन्नास पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात आहे.

महावितरणला याचा कोट्यवधींचा फटका बसत आहे. विद्युत मीटर अधिक सुरक्षित करण्याचे आव्हान  आता महावितरणसमोर उभे ठाकले आहे. घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती. ग्रामीण भागात आजही हे प्रकार सुरू आहेत. त्याशिवाय पूर्वी मीटरमध्ये लोखंडाची चकती होती. तेव्हा ती लोहचुंबक लावून तिचे फिरणे थांबविले जायचे. आता मीटरही डिजिटल आकड्यांचे झाले. मीटर आधुनिक झाले. तरीही चोर अनेक क्लृप्त्या लढवून विद्युत चोरीचे नवीन मार्ग शोधत आहेत. तालुक्यात एकूण वापराच्या २५ टक्के विजेची चोरी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

ग्रामीण भागातील गावागावत विद्युत तारांवर दिवसाढवळ्या आकडे टाकत असून त्या आकडा टाकलेल्या विजेच्या वायर रस्त्याच्या बाजूला लोंबकळत आहेत.लोंबकळणाऱ्या वायरमुळे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात एकूण वीज वापराच्या २५ टक्के विजेची चोरी होत असल्याचा प्रकार घडत असतानाच थकबाकीचे प्रमाणही लक्षणीय आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागांत वीजेची थकबाकी मोठी आहे.

अनधिकृतपणे तारावर केबल टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.तात्काळ विद्युत तारेवरील आकडे काढण्यात येतील.

- सी एस मोरे, महावितरण अभियंता, चारोटी