बांधकामांना संरक्षण देण्यासाठी अभियंत्याने मागितले ३० हजार, अडकला एसीबीच्या जाळ्यात

ठेका अभियंता(engineer) निलेश राजेंद्र कोरे याने ३ बांधकामांना संरक्षण देण्यासाठी ३० हजार रुपयांची(30 thousand bribe) मागणी केली होती.पैसे देऊनही बांधकामांवर कारवाई होत असल्यामुळे या बांधकामधारकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी धाव घेतली.

  वसई: अनधिकृत बांधकामांची(illegal construction) बजबजपुरी असलेल्या पालिकेच्या पेल्हार प्रभागातील अभियंत्याला ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या(anti corruption bureau caught engineer while taking bribe ) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

  महापालिकेच्या ९ प्रभागांपैकी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एफ प्रभागात मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती, चाळी, गोदामे,कंपन्यांचे बांधकाम अनधिकृतपणे करण्यात येत आहे.या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी ठेका पद्धतीवर नेमण्यात आलेले अभियंते लाच घेवून त्यांना अभय देत असल्यामुळे पालिकेचे नियमित अधिकारी बदनाम होत आहेत.

  अशा लाचखोर ठेका अभियंत्यामुळे सहाय्यक आयुक्त आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे अनेक प्रकरणांवरून उघड झाले आहे.प्रभागातील गटारे,रस्ते अशा मुलभुत बांधकामांसाठी नेमण्यात आलेले हे ठेकेदार अनधिकृत बांधकाम करणार्‍याशी संधान बांधून असतात,त्यातच सौदा फिसकटला तर हल्ला किंवा कारवाईची शक्यता निर्माण होते,अशा घटनाही घडल्या आहेत.

  पेल्हार प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर गेल्या आठवड्यात हल्ला करण्यात आला होता. पैसे देवूनही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप अनधिकृत बांधकाम करणार्‍यांनी यावेळी केला होता. मंगळवारी ३० हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  ठेका अभियंता निलेश राजेंद्र कोरे याने ३ बांधकामांना संरक्षण देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली होती.पैसे देऊनही बांधकामांवर कारवाई होत असल्यामुळे या बांधकामधारकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी धाव घेतली. त्यानुसार तक्रारीत तथ्य आढळल्यावर सापळा रचून निलेश कोरे याला पालिका कार्यालयाबाहेर ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

  एसीबीचे पोलीस निरिक्षक विलास मते, पोलीस नाईक सचिन मोरे,तानाजी गायकवाड,हवालदार आनंता महाले,महिला पोलीस शिपाई अश्‍विनी राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.