कोसबाड हिल इथं रानभाज्यांचं प्रदर्शन

या प्रदर्शनात रानभाज्यांचे ४० स्टॉल तर पाककृती स्पर्धाचे १७ स्टॉल ठेवण्यात आले होते. या महोत्सवात भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांमधून 3 क्रमांकापर्यंत बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.

पालघर : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनानं औचित्य साधून आदिवासींना रोजगार निर्मिती व्हावी, रानभाज्यांच महत्त्व आणि परिचय जनतेला व्हावा यासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या कोसबाड हिल इथं रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत.

या प्रदर्शनात रानभाज्यांचे ४० स्टॉल तर पाककृती स्पर्धाचे १७ स्टॉल ठेवण्यात आले होते. या महोत्सवात भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांमधून 3 क्रमांकापर्यंत बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी रानभाज्या महोत्सवात ठेवल्या रानभाज्याचं  प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धाची  पाहणी केली. निसर्गात उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी रानभाज्या शरिराला आवश्यक आहेत असं प्रतिपादन यावेळी खासदर राजेंद्र गावित यांनी केलं.