या चोरांची खरंच कमाल, डायरेक्ट १८ लाखांच्या चपलांची केली चोरी – पोलिसांनी केली अटक

पॅरागॉन चप्पल चोरी करणाऱ्या चोरांना अटक(Thieves Arrested) करुन १८ लाख ४४ हजार ४५९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.

    वसई : पॅरागॉन चप्पल चोरी करणाऱ्या चोरांना अटक(Thieves Arrested) करुन १८ लाख ४४ हजार ४५९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.

    वालीव पोलीस ठाणे हद्दीत समिउल्ला कंम्पाऊंड, वसई फाटा, येथे डायमंड नाजमिन हजियानी,यांचे पॅरागॉन चप्पलचे गोडाऊन आहे.या गोडाऊनमधून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या चपला २५ मे रोजी चोरी केल्या होत्या.याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात ४५४, ४५७,३८० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्हयातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक पुराव्यांच्या आधारे वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पालघर येथुन मेहबुब शेख (वय २२ वर्षे), सरोज राऊत (वय-२४ वर्षे) रा. आदर्शनगर,पालघर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा साथीदार  इम्तियाज सुरानी (वय २५ वर्षे) यांनी सदर गोडाऊनची बनावट चावी बनवुन त्या चावीच्या मदतीने वेळावेळी गोडाऊनमधील पॅरागॉन चप्पलचा माल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

    चोरी केल्यानंतर त्यांनी हा माल भाईंदर,जव्हार, पालघर, वाडा या ठिकाणी विकल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी छापे टाकुन चोरीचा माल विकत घेणारे व्यापारी यांना अटक करुन गुन्हयात वापरलेली एक महिंद्रा कंपनीची पिकअप जिप, वॅगनार कार, पल्सर बाईक व पॅरागॉन कंपनीचे चप्पल असा एकुण १८ लाख ४४ हजार ४५९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.

    ही कामगिरी पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले,नि.राहुलकुमार पाटील,गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.उप निरी.भोईर,हवा.मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख यांच्या पथकाने केली.