mango tree

पालघर(palghar) जिल्ह्यातील जवळपास ११०० छोटेमोठे शेतकरी ३०० हेक्टर क्षेत्रफळात आंबा पिकाची(mango) लागवड करीत आहेत. मात्र,मागील काही वर्षात पालघर व सफाळे परिसरातील बहुतेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आंबा फळबाग लागवडीकडे वळल्याने आंबा लागवड क्षेत्र वाढत आहे.

  नवीन पाटील, पालघर: बदलत्या हवामानाच्या(climate change) फटक्याने सलग तिसऱ्या वर्षी पालघर(palghar) जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना(mango farmers) फटका बसला आहे. जिल्ह्यातील काही झाडांना मोहोर आलाच नाही, तर काही झाडांचा मोहोर फलधारणे आधीच करपून गेल्याने यंदाच्या वर्षी १० ते १५ टक्के उत्पन्न घटल्याने आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. यासंदर्भात कृषी विभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी बाययतदारांकडून होत आहे.

  पालघर जिल्ह्यातील जवळपास ११०० छोटेमोठे शेतकरी ३०० हेक्टर क्षेत्रफळात आंबा पिकाची लागवड करीत आहेत. मात्र,मागील काही वर्षात पालघर व सफाळे परिसरातील बहुतेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आंबा फळबाग लागवडीकडे वळल्याने आंबा लागवड क्षेत्र वाढत आहे.

  हवामानाच्या बदलामुळे सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हा कृषी विभागाने पाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवून नुकसान भरपाई द्यावी.

  - चंद्रकांत चौधरी, आंबा बागायतदार, रामबाग, सफाळे

  पालघरमध्ये शेकडो हेक्टरवर आंबा लागवड केली असून चांगले उत्पन्न मिळत आहे. आंबा हे पीक वर्षातून एकदाच येते. परंतु त्यासाठी शेतकरी आपला पैसा त्याच्या मशागतीसाठी खर्च करत असतो. बागा साफ करणे, त्यांना शेणखत, सेंद्रिय खते, रासायनिक खते तसेच मोहोर येण्यासाठी पावसाळा नंतर बुरशी व तुडतुडे यांचा प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी करणे तसेच वाढलेली मजुरी व महागाई याबाबींवर त्याचा दरवर्षीचा खर्च होत असतो.

  मोहोर जळणे असा प्रकार नसून मँगो हॉपरचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन देत आहोत. तरी याबाबत पुन्हा पाहणी करून योग्य उपाययोजना केली जाईल.

  - तरुण वैती, कृषी अधिकारी, पालघर

  बदलते हवामान वेळोवेळी नि

  र्माण होणारे कमी दाबाचे पट्टे त्यामुळे संपूर्ण आकाश हे आठवडाभर ढगाळ राहणे मध्येच अवकाळी पाऊस पडणे, थंडी गायब होणे व उष्णता वाढणे अशा निसर्गाच्या बदलाचे विपरीत परिणाम आंबा पिकावर होत आहे. हवामानाचे हे बदल नेमके मोहोर येण्याची वेळ व कैरी पकडण्याची वेळ अशावेळीच होत असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.

  यंदाच्या वर्षी देखील हवामान बदलाचा फटका आंबा पिकांवर बसला आहे. जिल्ह्यातील वाडा, जव्हार, पालघर, बोईसर, सफाळे, केळवे, डहाणू आदी भागातील बऱ्याचशा झाडांना मोहोरच आलेला नाही. तसेच ज्या ज्या भागात तुरळक मोहोर आलेला आहे, तो फळधारणे आधीच करपून गेल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत.