#FriendshipDay2020 : मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण

  • कृषिव्हेज सिडस इंडिया कडून २ आगस्ट रोजी मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण आयोजित करण्यात आला

वाडा : वाडा तालुक्यातील पालसई येथे कृषिव्हेज सिडस इंडिया कडून २ आगस्ट रोजी मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण आयोजित करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य सुवर्णा स्वप्नील पाटील , पोलीस पाटील सुरेश रामचंद्र पाटील , ठाणे महानगर पालिका आरोग्य अधिकारी चंद्रकांत पष्टे, ग्रामपंचायत सदस्य  व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

कडुनिंबाची झाडे संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख झाडे उद्याच्या दिवसात लावली जाणार आहेत. कडूनींब झाडे ही आयुर्वेदाचे प्रतीक म्हणून या झाडाला ओळखले जाते. अशी माहिती कृषी व्हेज सीडसचे किरण पाटिल यांनी दिली. या वृक्षारोपणात ही या झाडांची लागवड केली. वाडा तालुक्यातील पालसई  या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला गेला.