वसईतील उद्याने,वाचनालये आठवडा बाजार सुरु

वसई : प्रदीर्घ काळानंतर उद्यापासून वसई तालुक्यातील वसईतील उद्याने,वाचनालये आणि आठवडा बाजार सुरु करण्याची परवानगी महापालिकेने दिले आहेत.२२ मार्चपासून वसई तालुक्यातील वाचनालये,सार्वजनिक उद्याने,बगीचे बंद होते.त्यामुळे जेष्ठ नागरिकांना घरात कोंडल्यासारखे होवून,त्यांच्यावर शारिरीक आणि मानसिक परिणाम जाणवू लागला होता.

वसई : प्रदीर्घ काळानंतर उद्यापासून वसई तालुक्यातील वसईतील उद्याने,वाचनालये आणि आठवडा बाजार सुरु करण्याची परवानगी महापालिकेने दिले आहेत.२२ मार्चपासून वसई तालुक्यातील वाचनालये,सार्वजनिक उद्याने,बगीचे बंद होते.त्यामुळे जेष्ठ नागरिकांना घरात कोंडल्यासारखे होवून,त्यांच्यावर शारिरीक आणि मानसिक परिणाम जाणवू लागला होता.कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जेष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलाना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. अखेर साडेसहा महिन्यांनी जेष्ठांचा विंरगुळा असलेली उद्याने आणि वाचनालये सुरु करण्याचे आदेश वसई-विरार महापालिकेने दिले आहेत.त्याप्रमाणे आठवडा बाजारही सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.तालुक्यातील शाळेतही ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारी बोलावण्यास हरकत नसल्याचा अद्यादेश पालिकेन काढला आहे. दरम्यान,बिअरबार,वाईनशॉप,देशी दारु,ताडी-माडीची दुकाने,हॉटेल,रिसॉर्टमध्ये आता १२ ते १४ तास विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.