बोईसर औद्योगिक वसाहतीमधील केमिकॉन इंडस्ट्रीज कंपनीत वायू गळती

सकाळी आठ वाजताच्या सुमारास या विषारी वायू ची गळती झाली असून वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अपघात टाळला.

पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा प्लॉट नं. १६/२५ मधील केमिकॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत विषारी वायुची गळती होऊन अपघात घडलाय. सकाळी आठ वाजताच्या सुमारास या विषारी वायू ची गळती झाली असून वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अपघात टाळला. मात्र परिसरातील नागरिकांना याचा त्रास जाणवला असून तीन कामगारांना विषारी वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मध्ये एका महिलेचा तर दोन पुरुषांचा समावेश आहे.