mogra farming vikramgad

विक्रमगड तालुका(vikramgad ) हा मोगरा(jasmine)0 उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील रोज अंदाजे १२-१३ टन मोगऱ्याच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमधे निर्यात होत असतात. मोगराच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात.  मात्र कोरोना या संसर्गाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. संचारबंदी लागू झाल्याने अनेकांचे हात मोकळे झाले ज्यात सर्वात जास्त फटका शेतकऱ्याला बसला.

अमोल सांबरे, विक्रमगड: विक्रमगड तालुका(vikramgad ) हा मोगरा(jasmine)0 उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील रोज अंदाजे १२-१३ टन मोगऱ्याच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमधे निर्यात होत असतात. मोगराच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात.  मात्र कोरोना या संसर्गाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. संचारबंदी लागू झाल्याने अनेकांचे हात मोकळे झाले ज्यात सर्वात जास्त फटका शेतकऱ्याला बसला.(farmers worried) त्यात फुलशेती पूर्णपणे संपुष्टात आली असून विक्रमगड तालुक्यातील मोगरा उत्पादित करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे.

खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी,उपराले, देहर्जा अशा अनेक गावात मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यानी केली आहे. उंबरवांगण , साखरे, पोचाडा, वाकी, कावळा या ठिकाणी शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी मोगरा लावला आहे. मोगऱ्याचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते ज्यात प्रतिकिलो ३०० ते ५०० इतका दर मिळत असतो. मात्र कोरोना संसर्गामुळे गिऱ्हाईक मिळत नसल्याने मोगऱ्याचे भाव ६० रुपये किलो झाले आहेत. तर मजुरांना४० रुपये किलो कळ्या खुडण्यासाठी द्यावे लागत असल्याने मजुरी एवढाच मालाचा भाव येत असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.

होळीपासून कोरोना व्हायरसचा फैलाव भारतात सुरू झाल्याने शेतीवर गदा आली ज्यात मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत सापडल्याने फुलशेतीवर कुऱ्हाड कोसळली. मोगरा उत्पादक रातोरात बेरोजगार झाला असून ऐन सराईत मोगऱ्याची मागणी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर तर गिऱ्हाईकच नसल्याने त्याचा फटका मोगरा उत्पादकाना बसला आहे. त्यामुळे या वर्षीचा हंगाम बरबाद झाला असून लाखो रुपयांचे उत्पन्न स्थगित झाल्याने शेतकऱ्यावर डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे.

नवरात्र व दिवाळीमध्ये मोगराचे भाव वाढण्याची आशा

नवरात्र व दिवाळीत फुलांना चागली मागणी असते. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आणि अतिशय कमी भावाने फुले विकली गेली. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मात्र फुलांचे भाव पुढील नवरात्र व दिवाळी काळात वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

यावर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत ऐन सराई निघून गेल्याने मोगरा वीकता आला नाही पावसाळ्यात मोगराला गिऱ्हाइक मिळत नसल्याने मोठे नुकसान झाले. आता व्यापारी केवळ ६० रुपये किलोने मोगऱ्याला भाव देत आहेत. मजुरांना कळ्या काढण्यासाठी आम्हाला ४० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

- हरी तारवी , मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड