परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान-पंचनामे करून भरपाई देण्याची भाजपाची मागणी

मोखाडा : मोखाडा(mokhada) तालुक्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सायंकाळी धोधो बरसणाऱ्या पावसामुळे(heavy rain) भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य कुसम झोले यांनी मोखाडा तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी हळव्या भाताची कापणी सुरू आहे. मात्र परतीचा पावसाने भात पीक भिजवली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालंय मोखाडयात ९० ते १२० दिवसात तयार होणाऱ्या हळवार जातीचे भात पीक कापणीसाठी तयार झाले आहे मागील काही दिवसापासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कापनीची कामे जोरात सुरू आहेत. परंतु गेल्या ४ ते ५ दिवसापासून  पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भात पीक पुन्हा भिजले आहे. मागील वर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते त्याची अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकरी गरीब कुटूंब देशोधडीला लागले असताना पुन्हा वरून राजाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालंय यामुळे नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे.