लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांना बसला फटका, राज्य शासनाने इतक्या जणांना केली मदत

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या टाळेबंदीचा(Lockdown) मोठा परिणाम फेरीवाले व पथविक्रेता यांच्यावर झाला. त्या अनुषंगाने शासन निर्णयान्वये राज्य सरकारमार्फत अधिकृत फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्याची घोषणा(Help To Hawkers) करण्यात आली होती.

  वसई : कोरोना काळात टाळेबंदीचा(Lockdown) फटका बसलेल्या वसईतील साडेबारा हजार फेरीवाल्यांना राज्य शासनाने अर्थसहाय्य केले आहे. उर्वरित अडीच हजार फेरीवाल्यांना लवकरच पुढील मदत करण्यात येणार आहे.

  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या टाळेबंदीचा मोठा परिणाम फेरीवाले व पथविक्रेता यांच्यावर झाला. त्या अनुषंगाने शासन निर्णयान्वये राज्य सरकारमार्फत अधिकृत फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात आली होती.

  या लाभाचे पॅकेज पंतप्रधान स्वनिधी मध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांना लागू करण्यात आले. त्याचा लाभ घेण्यासाठी वसई-विरार महापालिका क्षेत्रातील फेरीवाले व पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत १४ हजार ९०८ अर्ज केले होते.
  त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निहाय पात्र लाभार्थ्यांची यादी महापालिकेकडून तयार करण्यात आली.

  यादीनुसार राज्य स्तरावरून बँकव्दारे १२४४२ फेरीवाले व पथविक्रेत्यांना १५००/- रु. इतके आर्थिक सहाय्य त्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत. व उर्वरीत २४६६ फेरीवाले व पथविक्रेत्यांचे खातेक्रमांक व IFSC code हे दुरूस्त करून Googgle sheet मध्ये Update दोन दिवसात करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी फेरीवाल्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल.

  या कामाबाबत PM SVANidhi पोर्टलवर काम केलेले संगणक चालक,योजने संबंधित कर्मचारी व अधिकारी तसेच फेरीवाला अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत.

  ज्या फेरीवाल्यांच्या खात्यावर आर्थिक सहाय्य जमा झालेले नाहीत, असे फेरीवाले व पथविक्रेता यांना फोन करून Google sheet मधील माहिती अद्ययावत करण्याची सूचना देण्यात यावी, असा आदेशही महापालिकेच्या उपायुक्त डॉक्टर चारुशीला पंडित याने सर्व प्रभाग समितींच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.