जव्हार तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस, नागरिकांची झाली धावपळ

जव्हार तालुक्यात रविवारी सकाळी उष्णता वाढली असताना दुपारी अचानक सोसायटीचा वारा सुटला होता. दुपारी ४ नंतर विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला(rain in jawhar) सुरुवात झाली.

    विक्रमगड: रविवारी जव्हार तालुक्यात (rain in jawhar)सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाल्यानंतर काही क्षणातच तासभर मुसळधार पावसासोबत गारा पडल्याने नागरिकांची पळापळ उडाली.

    सकाळी उष्णता वाढली असताना दुपारी अचानक सोसायटीचा वारा सुटला होता. दुपारी ४ नंतर विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली.उन्हामुळे अंगाची होणारी लाही कमी झाली व लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरामधूनच पावसाचा आनंद घेत होते.

    दुसरीकडे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून बागायतदार हवालदिल झाले होते. आंब्याला आलेला मोहर तसेच झाडावर पिकलेल्या आंब्याचे मोठ्या प्रमाणात नासाडी होणार आहे.तर काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या काजू पिकाचा घास पावसाने हिरावून घेतला आहे.काही ठिकाणी झाडे उलमळून पडली आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.