Heavy rains lashed the state red alert to Mumbai and Konkan

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बंगालच्या समुद्रात गुलाब चक्रीवादळ(Cyclone Gulab) निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्ह्यांतील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी (Heavy Rain In Kokan)होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    पालघर: गुलाब चक्रीवादळामुळे(Cyclone Gulab) पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस(Heavy Rain In Thane And Palghar District) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन जारी(Helpline For Palghar) केली आहे.

    हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बंगालच्या समुद्रात गुलाब चक्रीवादळ निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्ह्यांतील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.

    याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, वीज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडून मृत्यू होणे, अशा घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, तालुका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात ८२३७९७८८७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात येत्या २४ तासात मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कालपासून ठाण्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. सखोल भागात पाणी देखील साचले आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. विना कारण बाहेर पडणाऱ्यासाठी शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच खाडी आणि समुद्र किनाऱ्या वरील ठिकाणी देखील न जाण्याचे आव्हान देखील केले आहे.

    आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री –१८०० २२२ १०८ व(Thane Corporation Helpline Number) हेल्पलाईन – ०२२२५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे.