हॉटेल वेटरने फेसबूक लाईव्ह करुन केली आत्महत्या

  • पालघरमधील जव्हार शहरातील इमारतीत एका २२ वर्षीय तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण आत्महत्या करताना फेसबूकवर लाईव्ह आला होता. लाईव्ह व्हिडिओ सुरु असताना त्याने गळफास घेतला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नवनाथ बोगे(२२) आहे. नवनाथ हा जव्हारमधील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. याच हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये हा तरुण वास्तव्यास होता.

पालघर – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. मार्च २०२० पासून सर्व नागरिक घरात बसले आहेत. त्यामुळे खुप लोकांनी नैराश्य आणि आर्थिक कारणांमुळे आपले आयुष्य संपविले आहे. मागील ३ महिन्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. पालघरमध्ये एक हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटरने देखील फेसबूक लाईव्ह व्हिडिओ करत गळफास घेतला आहे. यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. 

पालघरमधील जव्हार शहरातील इमारतीत एका २२ वर्षीय तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण आत्महत्या करताना फेसबूकवर लाईव्ह आला होता. लाईव्ह व्हिडिओ सुरु असताना त्याने गळफास घेतला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नवनाथ बोगे(२२) आहे. नवनाथ हा जव्हारमधील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. याच हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये हा तरुण वास्तव्यास होता. 

नवनाथ बोगे या तरुणानं गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास फेसबुक लाईव्ह करत आपल्या मित्रांशी गप्पा मारत होता. याचदरम्यान त्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. असे सांगुन तो गळफास घ्यायला लागला. ही घटना लाईव्ह व्हिडिओत कैद झाल्याने सोशल मिडियावर पसरली आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपासादरम्यान कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याने तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.