theft

आचोळे रोड येथील अग्निशमन केंद्राजवळील संगम इमारतीत राहणारे उंबरकर कुटुंब सात दिवसांपुर्वी आपल्या गावी गेले होते.तिथून परतल्यावर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले.त्यामुळे त्यांनी बेडखाली दडवलेल्या पैशांचा शोध घेतल्यावर ते जागेवर नसल्याचे दिसून आले.

    वसई : दुसर्‍या मजल्यावरील किचनचे ग्रील उचकटून चोरट्यांनी घरातील २२ लाखांचा(house robbery of 22 lakhs) ऐवज लुटून नेल्याची घटना तुळींज(tulinj) पोलीस ठाण्याच्या हद्दित घडली आहे.

    आचोळे रोड येथील अग्निशमन केंद्राजवळील संगम इमारतीत राहणारे उंबरकर कुटुंब सात दिवसांपुर्वी आपल्या गावी गेले होते.तिथून परतल्यावर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले.त्यामुळे त्यांनी बेडखाली दडवलेल्या १७ लाख रुपयांचा शोध घेतल्यावर ते जागेवर नसल्याचे दिसून आले. कपाटातील पाच-सहा तोळे सोनेही गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता किचनच्या खिडकीचे ग्रील वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असल्याचे दिसून आले.

    उंबरकर यांचा फ्लॅट दुसर्‍या मजल्यावर असताना, चोरट्यांनी किचनच्या खिडकीतून प्रवेश करण्याचे धाडस केले.तसेच उंबरकर यांनी बेडखाली १७ लाख रुपये दडवल्याची माहितीही त्यांनी मिळवली असल्याचे या धाडसी घरफोडीतून निष्पन्न झाले आहे. जुने घर विकून १७ लाख रुपये आले होते,असा खुलासा उंबरकर यांनी पोलीसांकडे केला आहे.या घरफोडीत उंबरकर यांच्या सांगण्यानुसार २२ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.