eco sensitive zone photo

वसई विरार(vasai virar) शहरात अनधिकृत बांधकामे(illegal bulding) , अतिक्रमणे सर्रास केली जात असताना आता भूमाफियांनी तुंगारेश्वर अभयारण्याच्या यादीत समाविष्ट असलेल्या महापालिकेच्या पेल्हार(pelhar) प्रभाग समितीत येणाऱ्या  इको सेन्सिटिव्ह झोनमध्येदेखील हात पाय पसरले आहेत.

वसई : वसई विरार(vasai virar) शहरात अनधिकृत बांधकामे(illegal bulding) , अतिक्रमणे सर्रास केली जात असताना आता भूमाफियांनी तुंगारेश्वर अभयारण्याच्या यादीत समाविष्ट असलेल्या महापालिकेच्या पेल्हार(pelhar) प्रभाग समितीत येणाऱ्या  इको सेन्सिटिव्ह झोनमध्येदेखील हात पाय पसरले आहेत.पालिकेला याबाबत विचारणा केली की कारवाई करणार इतके सांगितले जाते.  त्यामुळे  निसर्गाचा ऱ्हास व पालिकेची संर्वधनासाठी फिरवलेली पाठ पाहता याठिकाणी भविष्यात प्रदूषणाची चिंता निर्माण होणार आहे. फक्त पेल्हारच नव्हे तर वसई विरार शहर  महानगरपालिकेतील बहुतांश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हेच सुरु असल्याचे दिसत आहे.

वसई पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला असून विविध पक्षांचा किलबिलाट , प्राण्यांचा अधिवास आहे. याला बाधा निर्माण होऊ नये म्हणून परिसरातील २८ गावे  इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतात. असे पात्रदेखील वसई प्रांत अधिकारी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये तहसील, वन विभाग आणि इतर संबंधित विभागाला पाठविले होते. यातील काही भाग हा महानगर पालिकेच्या हद्दीत हि येतो पण पालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे निसर्गाचा बराच ऱ्हास झाला असून परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली दिसत आहे. शेकडो होऊन अधिक अनधिकृत बांधकामे आणि तबेले हटवण्यास पालिकेला किमान दोन ते तीन वर्ष जाऊ शकतात.

तुंगारेश्वर अभयारण्याच्या अवतीभवती असलेल्या गावांमध्ये पेल्हार हे एक गाव आहे. मात्र याठिकाणी प्रवेश करताच तबेले , नाल्याला अतिक्रमणाचा वेढा, अनधिकृत बांधकामे सर्रास पाहावयास मिळतात. एकीकडे तुंगारेश्वर अभयारण्याचे जतन करण्यासाठी  इको सेन्सिटिव्ह झोन  तयार करण्यात आला तरी वसई विरार शहर महापालिका मात्र अपयशी ठरली आहे. त्यातच उमर कंपाउंड, खान कंपाउंड, परमार कंपाऊंड , रिचर्ड कंपाउंड यासारखी अनेक परप्रांतीय नावे अनधिकृत औद्योगिक वसाहतीला देण्यात आली आहेत.तर अनेक तबेले, कारखाने निर्माण असून, त्याचे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने जप्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

याचबरोबर अनधिकृत बांधकामे फोफावत असल्याने  इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे अनधिकृत बांधकामाचे माहेरघर अशी जणूकाही व्याख्या तयार झाली आहे. महापालिका प्रशासन थातुरमातुर कारवाई करत समाधान मानत आहे. विधानसभेत किंवा मंत्र्यांनी प्रश्न विचारला कि कारवाई करतो असे संगत छायाचित्र व अहवाल समोर ठेवला जातो परंतु वस्तुस्थिती भयावह आहे.शेकडो बांधकामे ही लपवली जात आहेत.

तुंगारेश्वर अभयारण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुरातन महादेवाचे मंदिर यासह विविध वास्तू याठिकाणी आहेत. निसर्गाचं देखणं रूप पाहण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून पर्यटक, अभ्यासक येत असतात परंतु याच्या पायथ्याशी महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पेल्हार मध्ये विदारक रूप पाहावयास मिळत आहे.

वसई विरार शहर महापालिका अंतर्गत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते. पेल्हार प्रभाग समितीत देखील पुढच्या आठवड्यात तीव्र मोहीम हाती घेऊन अशाप्रकारची बांधकामे जमीनदोस्त केली जातील, असे वसई विरार महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान ?

एप्रिल २०१९ ला , एका पीआयएलचा निकाल देताना  मुंबई उच्च न्यायालयाने पेल्हारमधील, तक्रारीमधील काही नमूद ठिकाणी जर अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास त्वरित कारवाई करण्यास सांगितले होते. आजची परिस्थिती अशी आहे की अशा बऱ्याच ठिकाणी नुसती अनधिकृत नव्हे तर धोकादायक बांधकामे पाहावयास मिळतात. हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा  अवमान तर नाही ना, असा प्रश्न आता लोक विचारात आहेत.