पालघर जिल्ह्यात १२६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर ३९ हजार घरगुती गणेश मूर्तींची स्थापना

यंदा घरगुती गणेश मूर्तींची संख्या ही कमी झाल्याचे माहिती सांगण्यात येतेय. काही गणेश उत्सव साजरा न करतात ती रक्कम कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊ करीत असल्याची माहिती समोर येतेय. मुसळधार पाऊस आणि कोरोनाचे संकट या दुहेरी संकटात गणेशभक्त वावरताना दिसत आहेत.

वाडा : पालघर जिल्ह्यात कोरोना पार्श्वभूमीवर यंदा सार्जनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ १२६६ तर घरगुती गणेशाची स्थापना ३९ हजार पर्यंत झाली असल्याची पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांच्या कडून देण्यात आली. कोरोनाचे संकट लक्षात घेता मूर्तीची उंची कमी झाली. आणि गर्दी कमी करण्याचे निर्देश अशा काही वातावरणात हा गणेश उत्सव पार पडत आहे.

सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यंदा घरगुती गणेश मूर्तींची संख्या ही कमी झाल्याचे माहिती सांगण्यात येतेय. काही गणेश उत्सव साजरा न करतात ती रक्कम कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊ करीत असल्याची माहिती समोर येतेय. मुसळधार पाऊस आणि कोरोनाचे संकट या दुहेरी संकटात गणेशभक्त वावरताना दिसत आहेत.

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्त तयार झाले आहेत. सार्वजनीक मंडळ ही कोरोना पार्श्भूमीवर अटी शर्थीचे पालन करत हा गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे. वाडा तालुक्यातील चिंचघर गावतील प्रभाकर करु खिसमतराव, अतुल खिसमतराव हे कुटुंबीय तीन पिढ्याहून अधिक वर्ष गणेशमूर्ती सोबत विविध चलचित्रांचा देखावा करायचे. परंतु कोरोनामुळे पंचक्रोशीत नाविन्यपुर्ण देखावा तयार करुन गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करित असल्याची माहिती दिली आहे. एकंदरित पावसाचा जोर आणि कोरोना संकट हे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण घालत आहेत.