पालघरमध्ये गेल्या २४ तासांत ३७६ जणांना कोरोनाची लागण

सध्या पालघरमध्ये ३ हजार ६४७ जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आत्तापर्यंत सुमारे ५८३ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे २५ हजार ५३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

 पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३७६ नवे कोरोनाबाधित रूग्ण (New Corona Patients) आढळले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) देखील झाला आहे. पालघरमध्ये (Palghar) कोरोना रूग्णांचा एकूण आकडा २९ हजार ७६८ इतका झाला आहे.

सध्या पालघरमध्ये ३ हजार ६४७ जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आत्तापर्यंत सुमारे ५८३ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे २५ हजार ५३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

राज्यात सोमवारी १७.०६६ कोरोनाबाधित रुग्णांची भर (17,066 new patients in the last 24 hours in the state) पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,७७,३७४ झाली आहे. तर आज ३६३ रूग्णांच्या मृत्यूची (deaths ) नोंद झाली असून मृतांचा आकडा २९,८९४ वर पोहोचला आहे.