jan dhan scheme

जव्हार तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत तसेच डाक कार्यालयात जन धन योजनेचे हजारो खाते आहेत. महिलांच्या जन धन बचत खात्यात प्रति महिना ५०० रुपये प्रमाणे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या ३ महिन्याच्या कालावधीत एकूण १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार होते. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात टाळे बंदी जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली आहे.

जव्हार: कोरोना संसर्ग कमी व्हावा याकरिता संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जन धन(jan dhan) बचत खात्यात एप्रिल, मे व जून महिन्याच्या कालावधीत प्रति माह ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले होते. ही रक्कम गरजूंकडून तेव्हाच खर्च केली.तालुक्यात कोरोना कहर सुरू असल्याने रोजगाराच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे जव्हार तालुक्यातील गरीब महिलांच्या नजरा आसुसलेल्या आहेत.

जव्हार तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत तसेच डाक कार्यालयात जन धन योजनेचे हजारो खाते आहेत. महिलांच्या जन धन बचत खात्यात प्रति महिना ५०० रुपये प्रमाणे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या ३ महिन्याच्या कालावधीत एकूण १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार होते. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात टाळे बंदी जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली आहे.

परिणामी प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल,मे व जून या ३ महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना ५०० रूपे सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.  त्यानुसार जव्हार तालुक्यातील हजारो महिलांच्या जन धन बचत खात्यात ५०० रुपये अनुदान बँकांनी जमा केले.तालुक्यातील महिलांच्या बचत खात्यात डी बी टी च्या माध्यमातून जमा झाले होते.

तालुक्यातील काही महिलांची २ खाती देखील आहेत. त्यामुळे आधार लिंक असणाऱ्या एकाच खात्यात डी बी टी द्वारे रक्कम वर्ग करण्यात आली आहे.त्यामुळे गरीब परिस्थिती असणाऱ्या महिलांना जन धन अनुदान योजनेचा लाभ घेता आला.मात्र आता शासनाने जाहीर केलेल्या ३ महिन्यांचे अनुदान बँक खात्यात जमा न झाल्याने जन धन खाते धारक महिला मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.

एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळालेल्या जन धन योजनेच्या ५०० रुपयांनी कुटुंबाला खूप मोठा आधार आला होता. मात्र जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे सानुग्रह अनुदान लवकर मिळावे अशी माझ्यासारख्या बऱ्याच महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.

- छाया बल्लाळ, जन धन योजना लाभार्थी, जव्हार

गरीब योजनेतील महिलांना देण्यात येणारे जन धन खात्याचे ५०० रुपये हे केवळ ४ महिन्यांसाठी होते. यामध्ये तालुक्यातील जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत ५०० रुपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

- अभिजित कुलथे,शाखा व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,जव्हार