प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आदिवासी विकास विभागाच्या(adivasi development department) अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार मार्फत ३० आश्रमशाळा व १६ वसतिगृह आहेत. काही अनुदानित आश्रमशाळा असून यामध्ये जवळपास २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विनवळच्या सेंट्रल किचनचे प्रभारी अधीक्षक म्हणून दाभोसाचे अधीक्षक गाडीलोहार यांना कार्यभार सोपविण्यात आला होता.

    जव्हार: जव्हार (jawhar)तालुक्यातील दाभोसा आश्रमशाळेचे अधीक्षक किशोर गाडीलोहार (वय ४३) यांचे कोरोनाने निधन झाल्याची(ashram school superintendent died due to corona) धक्कादायक घटना घडली आहे.

    आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार मार्फत ३० आश्रमशाळा व १६ वसतिगृह आहेत. काही अनुदानित आश्रमशाळा असून यामध्ये जवळपास २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जानेवारी महिन्यात हळुहळू नववीपासून पुढील वर्ग भरविण्यास सुरवात झाली, त्यामुळे पुन्हा शिक्षक, अधीक्षक विद्यार्थी असा संपर्क सुरू झाला.

    काही दिवसांनी आदिवासी विकास विभागाचे शासकीय आश्रमशाळा विनवळ येथील सेंट्रल किचन सुरू करण्यात आले. विनवळच्या सेंट्रल किचनचे प्रभारी अधीक्षक म्हणून दाभोसाचे अधीक्षक गाडीलोहार यांना कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांच्यानंतर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि एकच बोंब उडाली. आश्रमशाळाच कोरोनो हॉटस्पॉट बनला.

    अधीक्षक किशोर गाडीलोहार हे नाशिकला राहतात. ते नाशिकहून ये जा करीत होते. त्यामुळे त्यांना प्रथम कोरोनची लागण झाली. त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी नाशिक येथे तपासणी केली व तेथेच ते पॉझिटिव्ह आल्यामुळे उपचार सुरू केला. मात्र काही दिवसांनी गुरुवारी पहाटे ४.३० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद नाशिक येथे करण्यात आली आहे.