koshsari to salshet travel

डहाणू : डहाणू तालुक्यातील कोशेसरी गाव सूर्या नदीकाठी वसलेले आहे. कोशेसरी गावाला पुराचा मोठा फटका बसला आहे. कोशेसरी गावात जाण्यासाठी सूर्या नदी ओलांडून जावे लागते .पण त्या ठिकाणी नदीवर पूल नसल्याने गावात जाण्यासाठी गेल्या कित्तेक वर्षापासून लोकांना लाकडी होडीने प्रवास करावा लागत आहे.

डहाणू : डहाणू(dahanu) तालुक्यातील कोशेसरी गाव(koshesari village) सूर्या नदीकाठी वसलेले आहे. कोशेसरी गावाला पुराचा मोठा फटका बसला आहे. कोशेसरी गावात जाण्यासाठी सूर्या नदी ओलांडून जावे लागते .पण त्या ठिकाणी नदीवर पूल नसल्याने गावात जाण्यासाठी गेल्या कित्तेक वर्षापासून लोकांना लाकडी होडीने प्रवास करावा लागत आहे. कोशेसरी भवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास असून येथील ग्रामस्थांना रोजगार, शिक्षण, गावातील मुलांना शाळेत पोहचण्यासाठी आणि गर्भविता महिलांना दवाखाण्यात जाण्यासाठी लाकडी होडीमध्ये जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. आरोग्याच्या समस्येवेळी सूर्या नदी ओलांडण्यासाठी लाकडी होडीचा वापर करून कोशेसरी ते सोलशेत असा १५० मीटर अंतर जीव मुठीत घेऊन पार करावे लागत आहे.(lack of bridge) (people travelling from boat)

सूर्या नदीमुळे(surya river) डहाणू आणि विक्रमगड तालुक्याच्या सीमा अधोरेखित केल्या आहेत. कोशेसरी ग्रामस्थांना सूर्या नदीवर पार करून डहाणू -नाशिक राज्यमार्गांवर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत आहे. या नदीच्या वाहतुकीवर डहाणू तालुक्यातील एकूण २९  गावे  व विक्रमगड तालुक्यातील १७ गावे जोडली आहेत. सूर्यानदीवर पुलाअभावी मोठी गैरसोय होत आहे. सायवन, उधवा, दाभाडी, किन्हवली, तर सायवन कडून गंगोडी, शेणसरी मार्गे विक्रमगड हा जवळचा संपर्क पुलाअभावी तुटलेला आहे. परिणामी सायवन राज्यमार्गाने विक्रमगड, वाडा, जव्हार,मोखाडा, नाशिक येथे जाण्यासाठी कासा गावाला वळसा घालून ३०किमी चे अंतर पार करावे लागत आहे. सध्या च्या काळात दळणवळणाच्या बाबतीत सदर प्रवास खर्चिक व वेळकाढू ठरणारा आहे.

पालघर जिल्ह्यात अजूनही आदीवासी समाज विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना येण्याजाण्यासाठी खूप मोठे कष्ट पडत आहेत.आम्ही प्रशासनाकडे बऱ्याच वर्षांपासून मागणी केली आहे येथे लवकरात लवकर पूल तयार करावा आणि गरीब आदिवासी लोकांचा त्रास कमी करावा.

- शैलेश करमोडा, डहाणू, जिल्हा परिषद सदस्य