डहाणूत कडक निर्बंधांचा चा फायदा घेत किराणा दुकाना कडून ग्राहकांची लूट; जास्त दराने विक्री करत असलेल्या दुकानदारांवर होणार कठोर कारवाई

कोरोनामुळे हातगाडीवर फळे आणि भाजी विकणाऱ्या विक्रेत्याची 'चांदी' तर गुळ, साखर, खोबरे, तेल, शेंगदाणाच्या भावात ठिकाणा नुसार बदल होत आहेत. ग्राहकांपुढे कुठलाही पर्याय नाही. हे ओळखून आता जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार पुन्हा एकदा ग्राहकांची लूट करू लागले असल्याचे चित्र सुरु आहे.

    पालघर : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले असून पालघर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

    प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे अन्य दुकानदारांनी दुकाने उघडलीच नाहीत. पर्यायाने बाजारपेठेत शुकशुकाट सुरु असून याचा फायदा घेऊन तालुक्यातील काही किराणा दुकानदार मनमानी कारभार सुरू आसल्याचे समोर आले आहे.

    कोरोनामुळे हातगाडीवर फळे आणि भाजी विकणाऱ्या विक्रेत्याची ‘चांदी’ तर गुळ, साखर, खोबरे, तेल, शेंगदाणाच्या भावात ठिकाणा नुसार बदल होत आहेत. ग्राहकांपुढे कुठलाही पर्याय नाही. हे ओळखून आता जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार पुन्हा एकदा ग्राहकांची लूट करू लागले असल्याचे चित्र सुरु आहे. डहाणू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात एरवी नाममात्र दरात मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची किंमत आता मात्र याच वस्तूची विक्री चढ्या भावाने होत आहे.

    नव्याने कड़क निर्बंध लागू करण्यात आल्याने माल येणार नाही व शिल्लक ही राहणार नाही, सर्व वाहतूक बंद राहणार आहेत, सरकार परत काय निर्णय घेईल त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात यायला किती वेळ लागेल सांगता येत नाही.’ असे सांगून दुकानदारांची मनमानी पुन्हा वाढली आसल्याचे डहाणू तालुक्यात समोर आले आहे.

    आशागड,चिंचणी,वानगाव, चारोटी,कासा, डहाणू बाजारपेठ या ठिकाणी व्यापारी चढ्या भावाने किराणा दुकानातील कडधान्य व इतर वस्तूंची विक्री करत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

    गुळ, साखर,खोबरे,तेल,शेंगदाणा याचे भावात तालुक्यातील विविध भागा नुसार बदल झाला आहे.

    कोरोना नियमावलीचे निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याने नागरिकांना मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल करण्याचे आदेश असल्याने मास्क वापरणाऱ्याच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहून आता मास्कच्या किमतीत अचानक वाढ करून विक्री सुरू आहे.

    सध्या डहाणू बाजारपेठेत मास्कवर कुठलीही किंमत न छापता काहीजण वाढीव दराने मास्क ग्राहकांना विकत आहेत. सॅनिटायझरच्या बाबत देखील तीच गत आहे. सध्या तर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने सॅनिटायझर उपलब्ध झाले आहे. त्याच्या दर्जाबद्दल देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

    दोन दिवसा मध्ये भाजीपाला ही महागला आहे. कोरोनामुळे हातगाडीवर फळे आणि भाजी विकणाऱ्या विक्रेत्याची ‘चांदी’ होत असून कोथिंबीर, फळांची विक्री,बटाटा,लसूण,या अति महत्वाचे जीवनावश्यक वस्तूं वाट्टेल त्या दराने विक्री सुरू करण्यात आली आहे. सध्या दोन दिवसात वाढलेले फळभाज्या ,पालेभाज्या यांचे दर आता सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाहीत.

    जर कोणी कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंच्या ठरवून दिलेल्या किमती पेक्षा जास्त दराने विक्री करत असेल तर अशा दुकानांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात जाईल.

    अशिमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डहाणू.

    अगोदरच्या किमती पेक्षा आताच्या किराणा मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने या वाढीला प्रशासनाने ठोस पाऊल उचलून कारवाही करावी. जेणेकरून सामान्य माणसाला या कोरोना काळातील कडक निर्बंध मध्ये जगता येईल.

    राहुल मेहऱ्या, ग्राहक डहाणू