murder house
ज्या घरात हल्ला झाला ते घर

सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान एका २० ते २२ वयोगटातील तरुणाने खानिवडे गावात राजेश तरे यांच्या घरात घुसून राजेश यांच्या दोन मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला (attack by sharp weapons)चढवला. यावेळी राजेश व त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातलगांंकडे सांत्वनासाठी गेले होते.

    वसई: एका अज्ञात तरुणाने खानिवडे गावातील घरात शिरून दोन मुलींसह चार जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला (attack on 4 people)केल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात पहिल्यांदाच खळबळ उडाली आहे.

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार पोलीस ठाण्याच्या सीमेवर असलेल्या खानिवडे गावात राजेश तरे यांच्या घरी ही घटना घडली.सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान एका २० ते २२ वयोगटातील तरुणाने तरे यांच्या घरात घुसून राजेश यांच्या दोन मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यावेळी राजेश व त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातलगांंकडे सांत्वनासाठी गेले होते. याच दुखवट्यासाठी विरार व पालघरमधील टेम्भोडे येथे राहणारे त्यांचे नातेवाईक रमेश तरे व त्यांची पत्नी रेखा तरे यांच्यासह भावजय अंजली तरे हे राजेशकडे रात्री वस्तीसाठी थांबले होते.

    हल्ला करणाऱ्या तरुणाचा रमेश तरे यांनी मोठा प्रतिकार केला.मात्र त्या तरुणाने त्यांनाही मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.दरम्यान बाथरूममध्ये असलेल्या अंजली तरे या किंचाळण्याचा गलका ऐकून बाहेर आल्या. दोन्ही दारे बंद करून हा तरुण हल्ला करीत असल्याचे दिसल्यावर अंजली यांनी प्रसंगावधान राखून मागील दार उघडले आणि आरडाओरडा करून ग्रामस्थांना गोळा केले.

    दरम्यान त्या तरुणाने अंजली यांच्याही हातावर वार केले व गाव जमल्याचे पाहून आपल्या डाव्या हाताची शीर कापून बाथरूममध्ये स्वतःला बंद करून घेतले. जमलेल्या गावकऱ्यांनी प्रथम पोलिसांना खबर देत जखमींना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर आलेल्या पोलिसांनी या तरुणाला बाहेर येण्यासाठी सांगितले .मात्र बाथरूमच्या खिडकीतून तो त्याच्या जवळील धारदार शस्त्र उगारून दाखवत असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगून पोलिसांनी दरवाजा फोडून त्या तरुणाला ताब्यात घेतले.

    हाताची नस कापल्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या या तरुणाला ही दवाखान्यात दाखल करण्यात आले.या हल्ल्यामुळे तरे यांच्या संपूर्ण घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. हा तरुण हा गावातला नसून तो नेमका कोण व हा एकंदरीत प्रकार काय आहे याचा तपास विरार पोलीस करत आहेत.