mns in vasai

मनसैनिकांना( police beating to mns workers) अमानुष मारहाण करणार्‍या पोलीस निरिक्षकावर कारवाई(demand to take action) करण्यासाठी मनसेकडून पोलीस अधिकार्‍यांना मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व महिला कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात धरणे धरतील असा इशारा देण्यात आला आहे.

वसई: मनसैनिकांना( police beating to mns workers) अमानुष मारहाण करणार्‍या पोलीस निरिक्षकावर कारवाई(demand to take action) करण्यासाठी मनसेकडून पोलीस अधिकार्‍यांना मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व महिला कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात धरणे धरतील असा इशारा देण्यात आला आहे.

सत्तेची गुलामगिरी करायची असेल तर कांबळे यांनी वर्दी उतरवून खुशाल शाखाप्रमुख व्हावे,अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली. तसेच मंगळवारपर्यंत कांबळेवर कारवाई न केल्यास आईबहिणीवरून शिव्या देणार्‍या पोलिसाला मनसेच्या महाराष्ट्रातील सर्व महिला जाब विचारतील,असा इशाराही यावेळी देशपांडे यानी दिला.

मंगळवारी दुपारी वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उद्घाटनानंतर आयुक्त साहेब वेळ द्या,अशा घोषणा देणार्‍या मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी ओढत नेऊन अमानुष मारहाण केली. मुकाट्याने पोलीसांच्या गाडीत बसल्यावरही त्यांना कांबळे यांनी अश्‍लिल शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध व्यक्त करून त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही कांबळे यांनी अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस उपायुक्तांची गुरुवारी भेट घेवून कांबळे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली.

मनसेचे नेते संदीप देशपांडे, राज ठाकरे यांचे सचीव सचिन मोरे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.