electricity bill

महावतिरणाच्या(mahavitran) वसई(vasai) विभागाने भाताची गिरण चालवणार्‍या एका शेतकर्‍याला चक्क ८० कोटी रुपयांचे वीजबील पाठवून जबर धक्का दिला आहे. मुलाच्या अकाली जाण्यामुळे दुःखात असलेला हा शेतकरी ८० कोटी रुपयांच्या बिलामुळे प्रचंड तणावाखाली आला आहे.

  रविंद्र माने, वसई: महावितरणाचे(mahavitaran) वीज बील(electricity bill problem) आणि घोटाळा हे समीकरण सर्वश्रुत असतानाच वसईतील एका शेतकर्‍याला चक्क ८० कोटी रुपयांचे बिल पाठवून महावितरणने घोटाळ्याचा नवा दाखलाच सादर केला आहे.

  रिंडींग न घेता अवास्तव बीले पाठवणे,३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर रिंडींग घेवून जास्त युनिटची बिले पाठवणे,वीज चोरीला सहाय्य करणे,ग्राहकांना उडवा उडवीची उत्तरे देणे,नोटीसा न देता वीज पुरवठा खंडीत करणे,शेकडोचे बील हजारोत पाठवून ते भरल्याशिवाय तक्रार न घेणे अशा कारभारामुळे महावितरण कंपनी कुप्रसिद्ध आहे. अशातच हम नही सुधरेंगे असे म्हणत महावतिरणाच्या वसई विभागाने भाताची गिरण चालवणार्‍या एका शेतकर्‍याला चक्क ८० कोटी रुपयांचे वीजबील पाठवून जबर धक्का दिला आहे. मुलाच्या अकाली जाण्यामुळे दुःखात असलेला हा शेतकरी ८० कोटी रुपयांच्या बिलामुळे प्रचंड तणावाखाली आला आहे.

  महावितरणाच्या बिलिंग सिस्टीममध्ये मोठा घोळ आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महावितरणाचे अधिकारी सर्वसामान्य ग्राहकांना उडवून लावतात. हजारोंमध्ये बिल आले तरी अगोदर भरा,असे सांगितले जाते.वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दलाली सुरु आहे.

  - मनोज म्हात्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

  नालासोपारा-मर्देस गावातील गणपत नाईक हे जगमाता मंदिराच्या मागे भाताची गिरण चालवतात.त्यांचे पुत्र सतीश यांच्या नावे या गिरणीचे वीज मीटर आहे. दरमहा त्यांना गिरणीचे वीजबील ५० हजारांच्या घरात येत होते. ते चक्क यंदा ८० कोटी रुपये पाठवण्यात आले आहे. दोन महिन्यांपुर्वी त्यांचा मुलगा सतीश वारल्ययामुळे नाईक कुटुंब दुःखात बुडाले आहे. त्यात ८० कोटी रुपयांच्या बिलाची भर टाकून नाईक कुटुंबाला तणावाखाली आणले आहे.चुकून पाठवलेली अवास्तव बिले अगोदर पैसे भरा नंतर दुरुस्त करून देऊ असे महावितरणाकडून सांगितले जाते.त्यामुळे ८० कोटी आणायचे कुठून हा दत्तप्रश्‍न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

  या बिलावर नजरचुकीने इतकी रक्कम टाकण्यात आली आहे. त्यामुळे ते वितरीत करू नका असे सांगण्यातही आले होते.तरीही चूक झालीच. हे बिल मागे घेण्यात आले आहे.

  - विजयसिंह दुधभाते, महावितरण जनसंपर्क अधिकारी कल्याण

  दरम्यान काही नेते मंडळींना ही बाब समजल्यानंतर ते नाईक यांच्या मदतीला धावून गेले.त्यांनी महावितरणाच्या अधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आणून देवून त्याचा जाबही विचारला.त्यामुळे महावितरणाचे अधिकारी पहिल्यांदाच नरमल्याचे दिसून आले.