gold mortgage

वीज कोणाचीही(electricity supply) तोडली जाणार नाही असे गाजर महाविकास आघाडी(mahavikas aghadi) सरकारकडून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अधिवेशनाच्या अगोदर देण्यात आले होते. अधिवेशन संपल्यानंतर हा महाविकास आघाडीचा खोटारडेपणा होता हे सिद्ध झाले.(gold mortgage for electricity bill) ३१ मार्चच्या आत आपले वीज बिल भरण्याचा फतवाच सरकारकडून काढण्यात आल्यावर महावितरण कर्मचारी आपल्या कामाला लागले.

   संतोष चुरी, पालघर: पालघर गोठणपूर येथील प्रवीण सोलंकी यांना वीज बिल भरण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलावे लागले आहे.  सोलंकी यांनी चक्क वीज बिल भरता यावे म्हणून गळ्यातल्या सोन्याचा दागिना जर गहाण ठेवला आहे.या घटनेनंतर हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे,असा टेंभा मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारातील मंत्र्यांना आणि आमदारांना खोट बोलण्याची लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उठत आहे.

  वीज कोणाचीही तोडली जाणार नाही असे गाजर महा विकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अधिवेशनाच्या अगोदर देण्यात आले होते. अधिवेशन संपल्यानंतर हा महाविकास आघाडीचा खोटारडेपणा होता हे सिद्ध झाले. ३१ मार्चच्या आत आपले वीज बिल भरण्याचा फतवाच सरकारकडून काढण्यात आल्यावर महावितरण कर्मचारी आपल्या कामाला लागले. अशात हातावर पोट असणारे पार होरपळून गेले आहेत.मात्र याचं सोयरसुतक या सरकारला बिलकुल नाही.

  गरमीने राज्यात कहर केला असून घरात वीज नसेल तर अंधारात पंखाविना राहायचे कसे घरात लहान लहान नातवंड आहेत ते झोपणार कसे या विवंचनेत प्रवीण सोलंकी आणि त्यांच्या पत्नी आहेत.मुदतीत बिल न भरल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापल्याने ते हतबल झाले आहेत.

  इमारतीमध्ये झाडू मारणे,लोकांच्या घरी घरकाम करणे ही कामे करून सोलंकी यांच्या कुटुंबाचे गुजराण कसेबसे चालू आहे.कोरोनाने कंबरडे मोडले असताना पाच महिन्याचे १४ हजार चारशे रुपये बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

  या अगोदर हप्ते पाडून बिल भरण्याची परवानगी होती आता ती पण नाही करायचे तर काय करायचे शेवटी गळ्यात असलेला सोन्याचा दागिना गहाण ठेवून त्यांनी कसेबसे ६ हजार रुपये जमा केले.

  पूर्ण बिल भरण्याचा तगादा अधिकारी लावत असताना शेवटी सहा हजार रुपये घेण्याचं त्या महिला अधिकाऱ्यांनी मान्य केल्यावर त्यांचा जीव कुठेतरी भांड्यात पडला. मात्र बाकीचे ८ हजार चारशे रुपये ३१ तारखेच्या आत भरण्याचा फर्मान निघाल्यावर आता इतके पैसे कुठून आणायचे या चिंतेत सोलंकी कुटुंबीय आहेत. सोलंकींसारखी अनेक कुटुंबे आहेत ज्यांना वीज बिलाची रक्कम भरणे हे आव्हान आहे मात्र सरकारला याची कोणतीच चिंता नाही हे दुर्दैव.