मराठा समाज आक्रमक,पालघर जिल्हा समन्वयक बैठकीत सरकार विरोधात ठराव

बोईसर: सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला(maratha reservation) स्थगिती(stay) दिली गेल्यामुळे राज्यभरात सकल मराठा समाज प्रचंड संतापलेला आहे. राज्यात सर्वत्र तालुका गाव तसेच जिल्हा पातळीवर सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा(maratha kramti morcha यांची बैठक(meeting) सत्र सुरू असून या बैठकीमध्ये सकल मराठा समाजाचे विविध ठराव पारित केले गेले असून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव पास केला सुप्रीम कोर्टात समाजाची बाजू भक्कम पणे न मांडल्याने राज्य सरकार मराठा समाजाच्या गंभीर नसेल तर आंदोलन करून सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे, असे मत मराठा समाजाकडून मांडण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील प्रमुख समन्वयक यांची मीटिंग ऑनलाईन पद्धतीने १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पार पडली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून समन्वयक यांनी सरकारच्या विरोधात ठराव पास केले. १५ सप्टेंबरला पाच वाजता बोईसर येथील पीडी इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस प्रा.ली , एमआयडीसी तारापूर याठिकाणी जिल्हास्तरीय मीटिंग घेण्याचे ठरले असून पुढील ठराव पास झाले आहे.
१. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक प्रवेशावर बंदीबाबतचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व शालेय शिक्षण फी संदर्भात वेळ काढून धोरण अवलंबले यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा.
२. राज्य सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्याबाबत तात्काल आवश्यक ती पाऊले उचलावीत.
३. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा समाज तीव्र नाराज असुन ही नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्रीमहोदय व विरोधीपक्ष नेते हे जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये शासकीय दौऱ्यावर येथील तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात यावेत.
४. संपुर्ण पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक घेऊन समन्वयकांशी चर्चा करून आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल.
५. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही विभागात नोकरभरती करू नये
६. ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना एसईबीसीच्या कोट्यामधून या वर्षासाठी प्रवेश मिळावा व शासकीय नोकरीमध्ये ज्यांची आरक्षणामधून निवड झाली आहे त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे. (आरक्षणा अंतर्गत)
हे सर्व ठराव घेण्यात आले असून मराठा समाजाकडून पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचे मत समाजाकडून व्यक्त करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने मराठा समाज्याच्या आरक्षणाला स्थगिती दिली असून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी तात्काळ आद्यादेश काढून कोर्टाने दिलेली स्थगिती उठवावी अन्यथा मराठा समाजा कडून प्रचंड रौद्र रुपात मोर्चे काढण्यात येतील. – वैभव जाधव,बोईसर, मराठा समाज राज्य समन्वयक