पालघर जिल्ह्यात तीन भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यात (Palghar district) डहाणू , तलासरी भागात भूकंप प्रवण क्षेत्रात पुन्हा रात्र भरपासून तीन सौम्य प्रकारचे भूकंपाचे धक्के (Three earthquakes) जाणवले आहेत. आज २.५० वाजता ३.५ रिस्टर स्केल (Rister scale)  , ४.१२ वाजता २.१ रिस्टर स्केल ५.४९ वाजता २ रिस्टर स्केल असे धक्के हे डहाणू तलासरी भागात जाणवले आहेत

वाडा : पालघर जिल्ह्यात (Palghar district) डहाणू , तलासरी भागात भूकंप प्रवण क्षेत्रात पुन्हा रात्र भरपासून तीन सौम्य प्रकारचे भूकंपाचे धक्के (Three earthquakes) जाणवले आहेत. आज २.५० वाजता ३.५ रिस्टर स्केल (Rister scale)  , ४.१२ वाजता २.१ रिस्टर स्केल ५.४९ वाजता २ रिस्टर स्केल असे धक्के हे डहाणू तलासरी भागात जाणवले आहेत.यात कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झाली नाही अशी माहिती मिळतेय.

तीन दिवसापासून अधूनमधून धक्के जाणवत आहेत. २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत एकूण पाच भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के जाणवले आहेत. आज २.५० वाजता ३.५ रिस्टर स्केल, ४.१२ वाजता २.१ रिस्टर स्केल ५.४९ वाजता २ रिस्टर स्केल, २० सप्टेंबर रोजी १२.४१ वाजता २.८ रिस्टर स्केल तर २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारास २.४ रिस्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे भूकंप धक्के जाणवले आहेत.