palghar mns savinay kaydebhang andolan

मनसेचे उप - जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.

पालघर : लोकल (Local)  सेवा सुरू करा ही सर्वमान्य मागणी करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप – जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करत  (violation of civil law) मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालघर (Palghar)  ते केळवा रोड (Kelwa Road) स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.

लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे ज्यांना रोजगारासाठी लोकलनं रेल्वे प्रवास करावा लागतो त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकल रेल्वे सेवा सुरू करा अशी सर्वमान्य मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. त्यामुळे सविनय कायदेभंग करून रेल्वे प्रवास करणार अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होती. त्याचं अनुषंगानं आज मनसेचे उप – जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.

यावेळी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष समीर मोरे, पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत, उपतालुका अध्यक्ष चेतन संखे, मनविसेचे अक्षय कोकणे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.