mokhada hostel

पालघर जिल्ह्यातील(palghar district) अतिदुर्गम भाग मोखाडा तालुक्यातील(mokhada) आदिवासी विद्यार्थ्यांचा पाया आश्रमशाळांमधूनच रचला गेला. यातच खोडाला(khodala) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात(hostel) अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्यामुळे या वसतिगृहाला आयएसओ प्रमाणीकरणाचे मानांकन मिळाले आहे.

जव्हार: पालघर जिल्ह्यातील(palghar district) अतिदुर्गम भाग मोखाडा तालुक्यातील(mokhada) आदिवासी विद्यार्थ्यांचा पाया आश्रमशाळांमधूनच रचला गेला. यातच खोडाला(khodala) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात(hostel) अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्यामुळे या वसतिगृहाला आयएसओ प्रमाणीकरणाचे मानांकन मिळाले आहे. तालुक्यात हे पहिलेच असे वसतीगृह ठरले आहे.
ग्रामीण आदिवासी भागातील मुलींना शिक्षणातून प्रगती साधणे हाच एक मार्ग आहे या करिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या माध्यमातून मुलींची राहणे खाणे पिणे ची चांगली व्यवस्था तालुक्यातून व्हायला पाहिजे या गोष्टींची पूर्तता करून विद्यार्थिनींना प्रोत्साहित करणे हा प्रमाण विषय आहे यातच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार विभाग नेहमीच एका वेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनला असताना या वसतिगृहाला हे प्रमाणीकरण मिळाल्याने येथे वाईट गोष्टी बाजूला सारून चांगल्या कामांना सुरुवात झाली आहे. या ठिकाणी प्रमाणिकरणासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली असून मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्याने महत्व दिले आहे. हे वसतिगृह भाडेकरारावर असतानाही जव्हार आदिवासी प्रकल्पातील अधिकारी यांचे मार्गदर्शन व वसतिगृहातील मुली यांनी यासाठी गृहपाल पुष्पा जाधव यांना साथ दिली.
टाळेबंदीत जाधव यांनी हे वसतिगृह अद्ययावत करण्यासह विविध सोयी-सुविधा येथे निर्माण केल्या. त्यानंतर आयएसओ प्रमाणीकरणासाठी अर्ज व या प्रयत्नात हे वसतिगृह त्यास पात्र ठरले. प्रमाणीकरण मिळाल्याबद्दल सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रजीत नायर आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोनवणे यांनी गृहपाल पुष्पा जाधव यांचे अभिनंदन केले आहे. प्रकल्प अधिकारी प्रजीत नायर आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने तसेच वसतिगृहातील मुलींच्या सहकार्याने लाॅकडाऊन काळात मी या सुविधा निर्माण करू शकले. तर इमारत मालकांनीही यासाठी सहकार्य केल्याने त्यांचे आभार जाधव यांनी व्यक्त केले आहेत.

आयएसओ प्रमाणीकरण मिळविण्यासाठी येथे मुलींसाठी स्वतंत्र भोजन आणि निवास व्यवस्था, स्वच्छ परिसर, ग्रंथालय, स्वच्छतागृह, आजारी मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था, कार्यालयीन नस्तीची व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासीका खोली, इमारतींची रंगरंगोटी यांसह मुलींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. या सुविधांसह प्रमाणिकरणासाठीच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध केलेल्या आहेत.

- प्रजित नायर, प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार

टाळेबंदीच्या काळात विद्यार्थिनींना आवश्यक सोयी सुविधा दिल्या असून मूलभूत सुविधा प्रमाणानुसार तयार करून घेतल्या आहेत.

- पुष्पा जाधव , गृहपाल,आदिवासी मुलींचे वसतिगृह,खोडाला