kapil patil

मोदी सरकारने (Modi government) छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना(Schemes For Farmers Welfare) आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन छोट्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत(Kapil Patil In Janashirwad Yatra) विविध ठिकाणी बोलताना केले.

    मुरबाड: मोदी सरकारने (Modi government) छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना(Schemes For Farmers Welfare) आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन छोट्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत(Kapil Patil In Janashirwad Yatra) विविध ठिकाणी बोलताना केले. यावेळी आ.किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, दिगंबर विशे, कुणबी सेना प्रमुख प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. ग्रामीण भागात जोरदार पाऊस असूनही यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावोगावी, चौका चौकात पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

    शेतकऱ्यांना केंद्रीय योजनांची माहिती  
    मुरबाड शहरात शेतकरी, आदिवासी आणि व्यापाऱ्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना निवेदने दिली. पाटील यांनी यावेळी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या मागणीसंदर्भात आपण व्यक्तिगत लक्ष घालू असे आश्वासन पाटील यांनी दिले. शिवले गावात वारकऱ्यांचा आणि केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चंदूदादा सेंद्रीय शेतकरी उत्पादक गट कंपनीच्या भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. कपिल पाटील यांनी या स्टॉलधारक शेतकऱ्यांना केंद्रीय योजनांची माहिती देण्याचे निर्देश स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना दिले.

    स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद
    सरळगाव, किन्हवली येथे चौक सभेत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा व शेतकऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडवली येथे त्यांनी मासेमारीसाठी हाताने जाळे व पागे विणणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. राज्यातील हे एकमेव गाव आहे जिथे ही जाळी हाताने विणली जातात. या कारागिरांनी मांडलेल्या प्रश्नात आपण लक्ष घालू असेही त्यांनी सांगितले. सापगाव येथेही त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. शहापूर शहरात यात्रा दोन तास उशीरा पोहोचूनही स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय भर पावसात उपस्थित होता.