vadhvan jetty

वाढवण बंदराला(wadhwan jetty) या भागातील स्थानिक मच्छीमार शेतकरी यांचा प्रचंड विरोध(protest against wadhwan) आहे. पंधरा तारखेला या भागात आयोजित केलेला कडकडीत बंद यशस्वी झाला. तथापि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मच्छीमार गावांमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित(rajendra gavit) हे अद्यापही कुठेच फिरकले नाहीत.

संतोष चुरी, पालघर : पश्चिम किनारपट्टीतील डहाणू जवळच्या प्रस्तावित वाढवण बंदराला(wadhwan jetty) या भागातील स्थानिक मच्छीमार शेतकरी यांचा प्रचंड विरोध(protest against wadhwan) आहे. पंधरा तारखेला या भागात आयोजित केलेला कडकडीत बंद यशस्वी झाला. तथापि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मच्छीमार गावांमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित(rajendra gavit) हे अद्यापही कुठेच फिरकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या जनाधाराला संथ गतीने गळती सुरू झाली आहे.गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्हा भाजप मुक्त झाला. पण या भागातील जनतेने खासकरून मच्छीमार समाजाने शिवसेनेची पाठराखण केली त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आला तर पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा आमदार विजयी झाला आहे.प्रत्येक निवडणुकीत या भागातील मच्छिमार समाजाने शिवसेनेची पाठराखण केली. शिवसेनेच्या या यशात मच्छीमार समाजाचा मोठा वाटा आहे. तथापि वाढवण बंदराच्या कामाचे संकट या भागातील मच्छीमारांवर आले असताना शिवसेनेचे पदाधिकारी नरोवा कुंजरोवा भूमिका घेत नाहीत.

गेल्या महिन्याभरापासून वाढवण बंदराच्या विरोधात संपूर्ण सागरी किनारपट्टीत प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना या भागातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे मच्छीमारांच्या प्रश्नावरील कुठल्याही आंदोलनाकडे अजिबात फिरकले नाहीत. प्रस्तावित वाढवण बंदरांमध्ये केंद्र सरकारचा ७४% व राज्य सरकारचा २६ टक्के वाटा आहे. याचा अर्थ हजारो कोटी रुपयांच्या वाढवण बंदरा साठी राज्याच्या तिजोरीतून २६ टक्के निधी जाणार आहे.यामुळे शिवसेनेने वाढवण बंदराबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे तसे घडताना दिसत नाही.

वाढवण बंदराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस पक्षाने विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अजून तळ्यात मळ्यात आहे.बहुजन विकास आघाडीने वाढवण बंदराला विरोध केला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांनी वाढवण बंदराच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजपची मंडळी वाढवण बंदराच्या विरोधात उभी राहत आहेत. मात्र शिवसेना अजूनही याप्रश्नी स्पष्ट भूमिका घेत नाही. हे दिसत असल्यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांच्याविरोधात वातावरण निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. या बंदराला स्थानिक जनतेच्या प्रचंड विरोध असून त्या विरोधाची भूमिका केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्थानिक खासदारांची आहे. मात्र राजेंद्र गावित यांची विरोधाची भूमिका फक्त वर्तमानपत्रात दिसते. प्रत्यक्षात या आंदोलनात ते कुठेच दिसले नाहीत आंदोलनाच्या दिवशी एखाद्या गावात जाऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असता तरी त्यांच्या सांगण्याला बळ प्राप्त झाले असते.

- वैभव वझे, सचिव, वाढवण बंदर कृती समिती

आम्ही इथल्या लोकांसोबत आहोत इथल्या लोकांच्या सोयीसुविधा अगोदर झाल्या पाहिजेत,विकासाचे प्रकल्प लोकांच्या सोयीने झाले पाहिजेत. स्थानिक लोकांच्या समस्या मार्गी लावून विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प असेल तर तो स्थानिक लोकांवर अन्याय होऊन होता कामा नये.

- नंदकुमार पाटील , भाजपा जिल्हा अध्यक्ष

वाढवण बंदर प्रकल्प सर्वसामान्यांना उध्वस्त करणारा असून या बंदराला सर्व स्तरातून विरोध होत आहे. जिल्ह्याचा खासदार म्हणून मीही येथील नागरिकांसोबत आहे.वाढवण बंदर विरोधी असलेली माझी भूमिका ठाम आहे व पुढेही राहील.

- राजेंद्र गावित, खासदार, पालघर लोकसभा