pills

पालघर(palghar) जिल्ह्यासह डहाणू(dahanu) तालुक्यात विविध मेडिकल स्टोअरमध्ये गर्भपातासाठीच्या गोळ्यांची बेकायदेशीररित्या विक्री सुरु आहे.विशेष म्हणजे या गोळ्यावर कोणत्याही अधिकृत कंपनीचे नाव, किंमत, उत्पादन दिनांक, वैधता समाप्ती दिनांक नसलेल्या गोळ्या उपलब्ध असल्याचेही आढळून आले आहे.

  जितेंद्र पाटील, डहाणू : एमटीपी(MTP) म्हणजे गर्भपात(tablets for abortion) करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या किटची(Abortion kit) सर्रास विक्री होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद आहे. या(abortion pills) गोळ्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी या गोळ्यांच्या पाकिटावर एमपीटी कायद्यान्वये मान्यता असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली वापरावे, असा स्पष्ट उल्लेख असावा, असे निर्देश केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये देण्यात आले आहेत. मात्र यासंदर्भात कोणत्याही औषध कंपनीने गांभीर्याने विचार केलेला नाही. अनेक ठिकाणी हे निर्देश नसलेल्या गोळ्या सर्रास विकल्या जातात. त्यामुळे या औषधांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. याकडे आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्यांनी लक्ष वेधले आहे

  पालघर जिल्ह्यासह डहाणू तालुक्यात विविध मेडिकल स्टोअरमध्ये गर्भपातासाठीच्या गोळ्यांची बेकायदेशीररित्या विक्री सुरु आहे.विशेष म्हणजे या गोळ्यावर कोणत्याही अधिकृत कंपनीचे नाव, किंमत, उत्पादन दिनांक, वैधता समाप्ती दिनांक नसलेल्या गोळ्या उपलब्ध असल्याचेही आढळून आले आहे. या अवैध गोळ्यांची विक्री करताना अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचा गोरखधंदाच मेडिकल चालकांनी सुरु केला आहे. या गोळ्या १२०० रुपयांपासून ते ३ हजारापर्यंत विकल्या जात आहेत.

  गेल्या कित्येक महिन्यांपासून मेडिकल स्टोअर्समध्ये अवैधरित्या घातक असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री सुरु आहे. अन्न व औषध तालुका अधिकारी याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष करत आहेत. मेडीकल स्टोअर व त्याच बरोबर अशा अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात यावी.

  - गजेंद्र वैष्णव, तक्रारदार, डहाणू

  या गोळ्यांच्या पाकीटावर गोळ्यांची किंमत, उत्पादन दिनांक, गोळ्यांची वैधता समाप्तीची तारीख असा कुठलाही उल्लेख नसल्याने या गोळ्यांमुळे गर्भवती युवती व महिलेच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो.

  गर्भपाताची वैद्यकीय प्रक्रिया करण्यापूर्वी त्या रुग्णाची रक्त गोठण्याची प्रक्रिया योग्यरितीने होते का, हे रक्त लघवीच्या वैद्यकीय तपासण्या करून पाहावे लागते. इतर संसर्गजन्य आजार असल्यास त्याचीही वैद्यकीय नोंद घ्यावी लागते. अतिरक्तस्राव, तीव्र पोटदुखी, उलट्या असे कोणतेही वैद्यकीय दुष्परिणाम जाणवले, तर त्यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित असणे गरजेचे असते. तसे न झाल्यास रुग्णाच्या प्रकृतीला धोका निर्माण होतो. त्यामुळे या किटचा वापर करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.

  अवैधरित्या घातक गर्भपाताच्या गोळ्या डहाणू,बोईसर,चिंचणी,वानगाव, आशागड़,कासा,मनोर,या ठिकाणच्या काही मेडीकलवर राजरोसपणे विकत असून याकडे अन्न व औषधी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या अशा मेडीकल दुकानांवर तात्काळ कारवाई करुन ते मेडिकल कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

  याबाबत अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क केला असत्ता त्यांनी या अवैध गोळ्याची विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.