mumbai badoda highway meeting

दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर यांनी आज मनोर मंडळ क्षेत्रातील साखरे गावात शेतकऱ्यांची बैठक(farmers meeting) घेतली होती.यावेळी तलाठी नितीन सुर्वे,मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे आणि साखरे गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते.

मनोर:प्रस्तवित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी(mumbai badoda highway) पालघर तालुक्यात भूसंपादनाचे काम सुरु असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. भूसंपादन प्रक्रिये दरम्यान मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर यांनी आज मनोर मंडळ क्षेत्रातील साखरे गावात शेतकऱ्यांची बैठक(farmers meeting) घेतली होती.यावेळी तलाठी नितीन सुर्वे,मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे आणि साखरे गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पालघर तालुक्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.भूसंपादन प्रक्रिये दरम्यान जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ग्रामीण भागातील निरक्षर आणि आदिवासी शेतकरी मोबदला मिळविण्यासाठी दलालांच्या भूलथापांना बळी पडत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.प्रत्यक्ष संपादन होत असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र भूसंपादन प्रक्रियेत दाखवले जाणे, सातबारा उताऱ्यावरील नोंदी आदी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत होत्या.याची दखल घेत पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसह बुधवारी साखरे गावात बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली.

बैठकीत शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्या. शेतकऱ्यांच्या शंकांचे तातडीने निरसन करण्याचे आदेश त्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना यावेळी दिले. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी दलालांपासून सावध राहावे.तसेच स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि उपविभागीय कार्यालयाशी संपर्कात राहून भूसंपादनाचा मोबदला प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले.