tree plantation by children

कोरोनामुळे करण्यात आलेल्या दिर्घ लॉकडाऊन काळात(lockdown) व्हिडीओ गेम,कार्टुन फिल्म,मोबाईल अशा मनोरंजनातून अबालवृद्धांनी आपला वेळ घालवला.शेकडो लोकांनी तर कॅरम,पत्ते खेळून दिवस ढकलले. मात्र अशावेळी तुळींज येथील नारायण नगर साईमंगल सोसायटीतील २० चिमुरडी फुलझाडे (children made garden in lock down)लावण्यात दंग होती.

  रविंद्र माने, वसई: लॉकडाऊन किंवा फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याचा आदर्श नालासोपारातील चिमुरड्यांनी निर्माण केला आहे. या मुलांनी फुलझाडे लावून एक उद्यान साकार केले आहे.

  कोरोनामुळे करण्यात आलेल्या दिर्घ लॉकडाऊन काळात व्हिडीओ गेम,कार्टुन फिल्म,मोबाईल अशा मनोरंजनातून अबालवृद्धांनी आपला वेळ घालवला.शेकडो लोकांनी तर कॅरम,पत्ते खेळून दिवस ढकलले. मात्र अशावेळी तुळींज येथील नारायण नगर साईमंगल सोसायटीतील २० चिमुरडी फुलझाडे लावण्यात दंग होती.

  पर्यावरणासंबंधी माहिती देऊन सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आवड निर्माण झाली. त्यातून आम्हाला रोपे लावण्याची प्रेरणा मिळाली.

  - वैष्णवी,बाग साकारणारी चिमुरडी

  वैष्णवी,युती,चैतन्य,आकृती,वेद अशा ५ ते १३ वयोगटातील चिमुरड्यांनी जास्वंद,गुलाब,सदाफुली, तुळस अशी अनेक रोपे त्यांनी लावली. त्यानंतर दररोज दोनवेळा या झाडांची निगा राखणे, त्यांना माती,खत आणि पाणी घालण्याचे काम त्यांनी नित्यनेमाने केले. या चिमुरड्यांची पर्यावरणासंबधीची ही काळजी आणि आस्था पाहून सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी त्यांची पाठ थोपटत सर्वतोपरी सहाय्य केले. त्यांना बियाणे,खते आदी साहित्य पदाधिकार्‍यांनी पुरवले. त्यामुळे पाहता-पाहता या रोपट्यांचे हिरवेगार उद्यान तयार झाले. या उद्यानातील फुलझाडांना या मुलांचीच नावे देण्यात आली आहेत.त्यामुळे मुलांची आठवण तर राहिलच, त्यांचा आदर्शही लोकांपुढे सतत राहिल,असा उद्देश साईमंगल सोसायटीने ठेवला आहे.

  आम्ही निसर्गप्रेमी आहोत. पर्यावरणाचे महत्त्व जाणतो. त्या दृष्टीने मुलांना माहिती दिली. ती पदाधिकार्‍यांनी उचलून धरत मुलांना बियाणे, खत आणि माती पुरवण्यात आली. त्यातून या मुलांनी हिरवीगार बाग उभी केली आहे.

  - पौर्णिमा गौर,रहिवाशी

  चिमुरड्यांनी फुलवलेली ही बाग पाहण्यासाठी तुळींज परिसरातील निसर्गप्रेमीं मंगलमुर्ती सोसायटीत डोकावू लागले आहेत.अनेकांनी त्यांची पाठ थोपटतानाच सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचेही अभिनंदन केले आहे.या चिमुरड्यांचा आदर्श घेत काही सोसायट्यांनी तर आपल्या मुलांना झाडे लावण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यास सुरवातही केली आहे.