sejal of nalasopara

मुलींचा संघ अस्तित्वात नसताना अथवा मुलींची संख्या क्रिकेटमध्ये नसताना सेजल राऊतने(sejal raut) सरावासाठी मुलांच्या संघातून स्थानिक पातळीवर अनेक सामने खेळले आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवर खेळताना दाखवलेल्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर तिने मुंबईच्या १९ वर्षाखालील संघात प्रवेश मिळवला होता.

    वसई: नालासोपारातील(nalasopara) फलंदाज सेजल राऊत(sejal raut) हिची मुंबईच्या सिनियर क्रिकेट संघात निवड झाली आहे.गुंडा या टोपण नावाने परिचित असलेली सेजल सोपारा गावातील ऐतिहासिक चक्रेश्‍वर तलावाजवळ राहते.

    मुलींचा संघ अस्तित्वात नसताना अथवा मुलींची संख्या क्रिकेटमध्ये नसताना सेजलने सरावासाठी मुलांच्या संघातून स्थानिक पातळीवर अनेक सामने खेळले आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवर खेळताना दाखवलेल्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर तिने मुंबईच्या १९ वर्षाखालील संघात प्रवेश मिळवला होता.

    या संघातून राज्य पातळीचे सामने खेळताना तिने सहा सामन्यांमध्ये २ शतके आणि २ अर्धशतकांसह ३७२ धावा कुटल्या होत्या. झारखंड,पंजाब,दिल्ली हरयाणा,उत्तराखंड,बंगाल अशा मातब्बर संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.या कामगिरीच्या जोरावर सेजलची २०१९ मध्ये २३ वर्षाखालील मुंबईच्या संघात निवड झाली होती. २०२० कोरोनामध्ये वाहून गेल्यानंतर तीला पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे फटके दाखवता येणार आहेत. यंदा तिची मुंबईच्या सिनियर संघात निवड झाली आहे.