मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जनआशिर्वाद यात्रेमध्ये(Janashirwad yatra) राणेंनी वसईतील(Vasai) उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thakre) निशाणा साधला आहे. “मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही.”असा टोला राणेंनी लगावला आहे. नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा(Narayan Rane Janashriwad Yatra In Vasai Virar)  सुरु आहे. आज त्यांनी वसई -विरार परिसराचा दौरा केला. यावेळी “मी घरात बसून काम करत नाही.”असेही उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले.

    जनआशिर्वाद यात्रेमध्ये राणेंनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामे देखील उद्धव ठाकरे यांनी केलेली नसल्याचे ते म्हणाले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते, त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांर निशाणा साधला. शुद्धीककरणाचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करा, असे ते म्हणाले.

    राणे पुढे म्हणाले की, “मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे. मी घरात बसून काम करत नाही किंवा व्यासपीठावर डावी उजीवकडे बघून उत्तरे देत नाही. मी जेवढी कामे केली त्याच्या एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केली नाही. ”  तसेच “नगरविकास मंत्री हे केवळ सही पुरते असून मातोश्रीच्या संमतीशिवाय एकाही फायलीवर सही होत नाही.” असा आरोपही राणेंनी केला.