navratra devi

विक्रमगड: अवघ्या तीन दिवसांवर म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे. मात्र यंदा नवरात्रोत्सवावरही (navratri festival)कोरोनाचे सावट आहे. विक्रमगड शहरात मूर्तीकार देवीच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरवताना त्यांच्या चित्रशाळेमध्ये दिसत आहेत.अनेक भागात छोट्या मोठया असंख्य मुर्तीकारांनी मूर्तीकलेचा वारसा जतन केलेला आहे. विक्रमगड तालुक्यात व शहरात देखील मूर्ती बनविणारे व्यापारी बंधु आहेत या व्यवसायामध्ये ते रात्रदिवस कष्ट घेत आहेत.

विक्रमगड तालुक्यात गावात मंडळांच्या मार्फत एकच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जात असुन एकोप्याने हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. मूर्तीकार एकनाथ व्यापारी यांनी  सांगितले की,नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तींची संख्या कमी असते तर गणेशमुर्तीची बनविण्याची संख्या जास्त असते. परंतु या व्यवसायात कुशल कारागिरांची कोरोनाच्या संकटामुळे उणीव जाणवत आहे. व्यापारी यांनी मूर्तीकला आत्मसात केली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली असल्याने व कोरोना माहामारीचे सकट या दुहेरी संकटामुळे मूर्तीसाठी लागणाऱ्या मातीपासून ते आवश्यक साहित्य सुध्दा खुप महागले आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीचाच अधिक आग्रह होतो,सध्या हा व्यवसाय बारमाही झाला आहे. भविष्यात कोरोनाचे संकट दूर झाल्यास मूर्तींची मागणी वाढती राहाणार आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाचा काळ वगळता अल्प मूर्तीकाम बनविण्याचे काम करीत असल्यामुळे आमची मूर्तीकला परंपरागत पद्धतीने सुरु राहीली आहे.