जागतिक चिमणी दिनानिमित्त शिक्षकांनी बांधली घरटी

या शाळेतील प्रमुख शिक्षक दीपक देसले यांनी लाकूड तसेच पत्र्याच्या डब्यांच्या साह्याने चिमनींसाठी घरटी तयार केली.त्यात तांदूळ आणि पाण्याची वाटी ठेऊन सुमारे दहा घरटी शाळेतील वर्गखोल्या आणि शाळा परिसरात वृक्षारोपण करून वाढविलेल्या झाडांच्या फांद्यांना लटकवली.

    डहाणू : २० मार्च हा दिवस जगभरात चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर डहाणू पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या घोलवड केंद्रातील टोकेपाडा शाळेत अनोख्या पद्धतीने चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
    या शाळेतील प्रमुख शिक्षक दीपक देसले यांनी लाकूड तसेच पत्र्याच्या डब्यांच्या साह्याने चिमनींसाठी घरटी तयार केली.त्यात तांदूळ आणि पाण्याची वाटी ठेऊन सुमारे दहा घरटी शाळेतील वर्गखोल्या आणि शाळा परिसरात वृक्षारोपण करून वाढविलेल्या झाडांच्या फांद्यांना लटकवली.
    मांजर किंवा अन्य प्राण्यांपासून चिमण्या भक्ष होणार नाही ही खबरदारी घरटी लावण्या आधी घेतल्याचे देसले म्हणाले. गतवर्षी सुद्धा लाकडाची पाच घरटी शाळेत लावली होती. हा उपक्रम सफल झाल्यानेच यंदा आणखी दहा घरटी तयार केल्याचे देसले म्हणाले. या उपक्रमाची चर्चा परिसरात होऊ लागली असून या चिमणी वेड्या शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.