पालघर जिल्ह्यात निर्बंधांबाबत नवीन आदेश लागू, लग्न समारंभाला दिली परवानगी

राज्य शासनाने शनिवारी नवीन आदेश जारी केले. त्या अनुषंगाने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी(palghar collector) नवीन बदल करून जुने आदेश(new order) रद्द केले आहेत.लग्न समारंभांना नवीन आदेशात परवानगी(permission for marriage) देण्यात आली आहे.

    पालघर: पालघर जिल्ह्यात(palghar) कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरुसळ यांनी ५ एप्रिलपासून जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचे आदेश पारित केले होते. ते आदेश रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाने शनिवारी नवीन आदेश जारी केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन बदल करून जुने आदेश रद्द केले आहेत.लग्न समारंभांना नवीन आदेशात परवानगी देण्यात आली आहे.

    मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन यांच्याकडील आधीच्या आदेशात बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की बगीचा समुद्र किनारा उद्यान बंद राहणार आहेत. या ठिकाणी नागरिकांनी उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

    सायंकाळी आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे मुखपट्टी (मास्क) परिधान न केल्यास पाचशे रुपये इतका दंड करण्यात येणार आहे.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे रुपये १ हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच १५ एप्रिलपासूनचा विवाह बंदीचा आदेश रद्द करण्यात आला असून विवाह समारंभास ५० लोकांना उपस्थित राहण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांच्याकडून परवानगी घेण्याचा व कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभात परवानगी देण्यात येणार आहे.

    सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी आठपर्यंत सुरू राहतील. खाद्यगृह, परमिट रूम बार सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. डिलिव्हरी किचन वितरण कक्ष  दहापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयामध्ये गर्दी टाळण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना तातडीचे काम असलेल्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे,असे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पारीत केले आहेत.