मासे चोरीच्या भांडणात एकाची दगड घालून हत्या
मासे चोरीच्या भांडणात एकाची दगड घालून हत्या

  • एका आरोपीला अटक, एकाचा शोध सुरू

वाडा (wada) : मासे चोरी वरून झालेल्या भांडणात (dispute) एक ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एक ४० वर्षीय पुरुष आरोपीला पालघर जिल्ह्यातील (Palghar) वाडा पोलिसांनी (wada police) तात्काळ अटक (arrest) केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना वाडा तालुक्यातील (wada tehsil) दिनकर पाडा (dinkar pada) येथे घडली आहे.

वाडा तालुक्यातील मयत नारायण चौधरी यांच्या शेताजवळ मासे पकडायचे साधन तयार केले होते. त्या साधनात पडलेल्या माशाची शेजारील व्यक्ती चोरी करत असल्याच्या संशयावरून आरोपी यांच्यात भांडण झाले. यात आरोपी महिला व पुरुष यांनी मयत नारायण चौधरी याला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. मयत नारायण चौधरी आणि आरोपी हे एकाच गावातील आहेत.

१९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९ ते ११ च्या कालावधी सुमारास ते मासे पकडण्यासाठी केलेल्या ठिकाणी गेले असता त्यांचे आणि आरोपींचे रात्री त्या ठिकाणी भांडण झाले. या भांडणात दोघा आरोपींनी नारायण चौधरी याला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात मयत आपल्या वडिलांचा शोध नातेवाईकांनी घेतला असता हा प्रकार २० सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. यातील पुरुष आरोपीला ३ तासात अटक केली आहे. यातील महिला आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती वाडा पोलिस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांनी दिली.