बोईसर येथील मेडले फार्मासिटिकल कारखान्याला उत्पादन बंद करण्याचे एमपीसीबी कडून आदेश

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्रमांक एफ -१३ मधील मेडले फार्मास्युटिकल्स या कारखान्यातील धोकादायक घनकचऱ्यांचे जवळ पास १५० ड्रम विल्हेवाटी साठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेकडे न पाठवता बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

    बोईसर : घातक घनकचऱ्याची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक करताना आढळून आल्याने तारापूर औद्योगिक वसाहती मधील मेडले फार्मास्युटिकल्स या कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

    तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्रमांक एफ-१३ मधील मेडले फार्मास्युटिकल्स या कारखान्यातील धोकादायक घनकचऱ्यांचे जवळ पास १५० ड्रम विल्हेवाटी साठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेकडे न पाठवता बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

    त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मेडले फार्मास्युटिकल्स या कारखान्याला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कारखान्याचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

    तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये काही पैशांच्या बचती साठी घातक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच दिवसेंदिवस वाढतच असून कारखानदारच निसर्गाचा ऱ्हास करत असल्याचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. दरम्यान घातक घनकचऱ्याच्या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणाच्या पोलिस कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.