revera hospital oxygen plant

विक्रमगड(vikramgad hospital) तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये(revera hospital) होता होता राहिली. अचानक रिव्हेरा कोव्हीड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल्व्ह लिकेज(oxygen leakage in revera hospital) झाल्याने ऑक्‍सिजन गळतीला सुरुवात झाली.

    अमोल सांबरे, विक्रमगड: काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या २ जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे(Oxygen Tank Leakage) दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती सोमवारी संध्याकाळी विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये होता होता राहिली. अचानक रिव्हेरा कोव्हीड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल्व्ह लिकेज झाल्याने ऑक्‍सिजन गळतीला सुरुवात झाली.

    या घटनेमुळे एकच खळबळ माजली. मात्र प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या रुग्णालयात ३०२ रुग्ण उपचार घेत असुन एकूण १५० रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ.रामदास मराड यांनी दिली.

    जम्बो ऑक्सिजन टँकमधून येणारा ऑक्सिजन पाईप लूज झाल्याने थोड्या प्रमाणात ऑक्सिजन लिकेज होत होते. मात्र हे लक्षात येताच तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये सध्या ३०२ रुग्ण आहेत.तसेच १५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

    - डॉ. रामदास मराड, अतिरिक्त नोडल ऑफिसर, रिव्हेरा हॉस्पिटल

    या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी रिव्हेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉ.प्रशांत राजगुरू यांना अनेक वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कुठला ही प्रतिसाद दिला नाही.