oxygen plant in palghar

पालकमंत्री दादाजी भुसे(dadaji bhuse) यांच्या निर्देशानुसार ऑक्सिजन निर्मितीसाठी(oxygen plant in palghar) ३ कोटी २० लाखाची प्रशासकीय मंजूरी जिल्हा विकास योजनेतून देण्यात आली असून त्यापैकी पालघर व जव्हार चे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

    पालघर :  पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सिजनची लवकरच निर्मिती होणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

    पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार ३ कोटी २० लाखाची प्रशासकीय मंजूरी जिल्हा विकास योजनेतून देण्यात आली असून त्यापैकी पालघर व जव्हार चे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला. उपजिल्हा रुग्णालय, जव्हार व डहाणु ग्रामीण रुग्णालय पालघर या सर्व ठिकाणी कोविड रुग्णालय स्थापन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.